जीतूगा
मै यह खुद से वादा करो...जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो...तकदीर भी रूठे पर
हिंमत न टुटे...मजबूत इतना अपना इरादा करो... या कवीतेतील ओळीचा प्रत्यय बुलडाणा
येथील उज्वला भारतलाल जुनागडे यांच्या रूपाने येतो. लहानपणापासून हुशार व अभ्यासू
असलेल्या उज्वला जुनागडे यांनी ग्रंथालय शास्त्र या विषयात सेट व नेट परिक्षा
उत्तीर्ण करीत आपले कर्तृत्व सिद्ध केले. या परीक्षांची तयारी करतांना त्यांनी
कुठलीच कुचराई केली नाही. उज्वला जुनागडे यांनी दुर्दम्य इच्छा शक्ती,जिद्द व प्रयत्नाची पराकाष्ठा करीत
ग्रंथालय
शास्त्र या विषयात सेट व नेट परिक्षा उत्तीर्ण केली. युजीसी अंतर्गत घेणात आलेल्या नेट,सेट
या परिक्षेत यश त्यांनी यश संपादित केले.
उज्वला जुनागडे या सध्या पुणे येथील एस.एन.डी.टी. विद्यापीठात कनिष्ठ ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. उज्वला
जुनागडे यांनी संपादन केलेले यश खरोखर कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी
त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. त्यांच्या यशाचे श्रेय पती आनंद जाधव,आई वडील,सासू व सासरे यांना देतात.
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
Congratulations Ujwala vahini 💐💐💐we all proud of you🙏🙏 Thanks a lot Santoshji thorhate for support🙏
उत्तर द्याहटवा