Responsive Ads Here

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

किमया बुधवाणीचे फोल्डेबल हेल्मेट तालुकास्तरावर


विवेकानंद विद्या मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये येथील किमया कमलेश बुधवाणी या विद्यार्थीनीचे फोल्डेबल हेल्मेट प्रथम आले असून याची तालुकास्तरावर निवड झाली आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त असलेल्या जिज्ञासू संशोधक वृत्तीला चालना प्रोत्साहन देण्यासाठी विवेकानंद आश्रम दरवर्षी कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज यांचा जयंती निमित्त जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन  करण्यात येते. विवेकानंद विद्या मंदिरात आयोजीत केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीला जिल्हाभरातील बालवैज्ञानिकांना आपल्या प्रयोगाव्दारे अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध होते. यावर्षी  या विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्हयातील १२६ बालवैज्ञानिकांनी आपला सहभाग नोंदविला होता. विवेकानंद विद्या मंदिरात इयत्ता मध्ये शिकणारी कु.किमया कमलेश बुधवाणी या विद्यार्थीनीच्या फोल्डेबल हेल्मेट चा प्रथम क्रमांत येवून तीच्या फोल्डेबल हेल्मटची तालुकास्तराव निवड झाली. दरवर्षी रस्ता अपघातात मृत्यू पावणा-यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. दुचाकीस्वार अपघात झाल्यानंतर त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मृत्यू होते. किमया बुधवाणी हीने बनविलेले फोल्डेबल हेल्मेट हे अत्यंत कमी खर्चात घरी तयार करता येते. हे हेल्मेट अत्यंत कमी वजनाचे असल्यामुळे मान दुःखीच्या रूग्णांसाठी या फोल्डेबल हेल्मेट फायदेशीर ठरणार आहेया विज्ञानप्रदर्शनी मध्ये वर्ग ते मधून प्रथम क्रमांक फोल्डेबल हेल्मेट या कु.किमया बुधवाणी हीचा आला. तर व्दितीय सुरक्षा अलाराम आनंद खराटे,तृतीय जलविद्युत निर्मिती महेश देवकर यांने पटकाविला. वर्ग ते मधून प्रथम प्रथम डोंगराळ प्रदेशातील वाहतूक सुरज कंकाळ,अनिल धंदर,व्दितीय ईस्त्राईल शेती कु.पुजा काकडे,कु.पुजा डुकरे,कु.पुजा जाधव तर तृतीय स्मोक क्लिनर ओम पोफळे,नकुल देशमुख,मंगेश खिल्लारे यांनी पटकाविला.विज्ञान प्रदर्शनाचे मुल्यमापन प्रा.तायडे,प्रा.राठी,प्रा.दाभाडे ,मारोती ठाकरे,विजय गोसावी,मारोती घोरपडे,विष्णु सुरडकर,सदानंद शेळके यांनी केले.

असे बनविले फोल्डेबल हेल्मेट
मक्याचे पिठ आणि पाणी यांचे मिश्रण करून द्रावण तयार करावे हे द्रावण प्लास्टिक पिशवी मध्ये भरावे टोपी मध्ये ही पिशवी घालावी. मक्याचे पिठ आणि पाणी यांच्या मिश्रणाने नॉन न्युटेनियन फ्लूड  तयार होतो. जेव्हा या मिश्रणावर अचानक दाब पडता क्षणीच न्युटेनियम फ्लूड कडक बनतो त्यामुळे डोक्याला जबर मार बसण्यापासून वाचता येते.

रस्ता अपघातामध्ये डोक्याला जबर मार बसल्यामुळे मृृत्यू पावणाèयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फोल्डेबल हेल्मेट ही अत्यंत कमी खर्चात तयार होते.
किमया कमलेश बुधवाणी, विद्यार्थीनी हिवरा आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

तू 'शाहीं' है 'परवाज़' है काम तेरा



ग्रामीण कलावंताला आपल्या कलेचे प्रकटीकरण करण्याची योग्य संधी मिळल्यास त्याचे कसे सोने होते हे हिवरा आश्रम येथील युवा शाहिर विक्रांतसिंह राजपूत  अक्षय राजपूत यांनी दाखवून दिलेशाहिरी कलेची परंपरा लाभलेल्या या गुणी  युवा  शाहिराला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेझी युवा सिंगर एक नंबर या  रिअ‍ॅलिटी शोच्या महाअंतिम सोहळयाचे विजेतेपद विदर्भ मराठवाडाच्या एम.एच.फोक्स या ग्रुपने पटकावुन बुलडाणा जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवलाविदर्भ मराठवाडयाच्या या एम.एच.फोक्स या  ग्रुपमध्ये बुलडाण्याच्या शाहिर विक्रांतसिंह  राजपूत  अक्षय राजपूत या दोन शाहिर बंधूचा उल्लेखनिय सहभाग होता.
 झी.युवा qसगर एक नंबर या महाअंतिम सोळयाचे मानकरी ठरलेल्या एमएच फोक्स या ग्रुपला जेष्ठ नेते शरदचंद्र पवार,सुप्रियाताई सुळे,रोहित पवार यांच्या हस्ते  लाख ६० हजार रूपये,सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.यावेळी स्पर्धेचे परिक्षक वैभव मांगल्ये,सावणी शेंडे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.
दिवसेंदिवस लोप पावत चाललेल्या महाराष्ट्राच्या अभिजात लोककलेला,सर्जनशीलतेची जोड देत शाहिर विक्रांतसिंह राजपूत  अक्षय राजपूत या युवा कलाकारांनी विदर्भ मराठवाडयाचा एमएच फोक्स या ग्रुपची स्थापना करून झी युवा सारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या लोककलेचे नाविण्यपूर्ण सादरीकरण करीत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले.  युवा सिंगर  एक नंबर या रिअ‍ॅलिटी शोच्या महाअंतिम फेरीतील उत्कंटावर्धक विजेतेपद पटावले.
एमएच फोक्स ग्रुपेने पारंपारीक संगीताला नाविन्याची जोड देत रसिकांचे मनोरंजन केलेप्रबोधनाची उत्तुंग झेप घेणा-या एम.एच.फोक्स ग्रुपमध्ये संकेत राजपूत औरंगाबाद,अनिल घोगरे औरंगाबाद,कल्याण उगले जालना,संतोष साळुंके लातूर,प्रतिज्ञा गायकवाड लातूर,स्वरांजली पंचाळ लातूर  बुलडाणा जिल्हयातील शाहिर विक्रांतसिंह राजपूत,अक्षय राजपूत यांचा समावेश होता.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील उच्चतम कलाविष्काराचे प्रकटन करणा-या  प्रसिध्दपासून दूर असणा-या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम झी युवा या वाहिनीने झी युवा सिंगर एक नंबर या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेया दोन्ही बंधूंनी कल्पक सादरीकरणातून महाराष्ट्रातील रसिकांच्या मनाचा ठाव घेतलाबुलडाणा जिल्हयाच्या लोक परंपरेला चार चाँद लावलेएमएच फोक्स ग्रुपने मुंबई येथे झालेल्या ऑडिशन प्रक्रियेचे तीन राऊंड पार करत या संघाने मेघा ऑडिशनमध्ये स्थान मिळविले.एमएच फोक्स या ग्रुपूने महाराष्ट्राच्या काळजाचा ठाव घेत रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजविलेशाहिर विक्रांतसिंह राजपूत हे  स्व.बाबुसिंह राजपूत यांचे सुपूत्र सज्जनसिंह राजपूत यांचे पुत्र आहे.


बुलडाणा जिल्हयाच्या शिरपेचात मानचा तूरा
युवा शाहिर विक्रांतसिह राजपूत  अक्षय राजपूत या बंधूंनी शाहिरी कलेची परंपरा लाभलेल्या या गुणी शाहिराला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेझी युवा सिंगर एक नंबर या  रिअ‍ॅलिटी शोच्या महाअंतिम सोहळयाचे विजेतेपद विदर्भ मराठवाडाच्या एम.एच.फोक्स या ग्रुपने पटकावुन बुलडाणा जिल्हयाच्या
शिरपेचात मानाचा तूरा रोवला.

विदर्भातील शाहीर बंधूंची निवड ठरली लक्षवेधी
या शोच्या ऑडिशनसाठी ३० स्पर्धकांची निवड करण्यात आली होतीचाळणी प्रकियेतून १६  कलावंतांची या स्पर्धेसाठी अंतिम निवड करण्यात आली होतीया निवड झालेल्या १६ स्पर्धेकांमये विदर्भातील शाहिर विक्रांतसिंह  राजपूत  अक्षय राजपूत या दोन बंधूची निवड लक्षवेधी ठरली.

शाहिरी परंपरा अविरत सुरू
बाबूसिंह राजपूत यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या शाहिरी कार्यक्रमातून महाराष्ट्रभर प्रबोधनाचे मोठे काम केलेशाहीर बाबूसिंह राजपूत आणि त्यांचे गुरू शाहीर गोकुळसिंह क्षत्रिय यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात आपल्या शाहिरीने संबंध महाराष्ट्र भर शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम केले राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम केलेत्यांच्या हा वसा शाहिर सज्जनसिंह राजपूत यांनी समर्थपणे सुरू ठेवत आपला मुलगा विक्रांतसिंह याला सुध्दा शाहिरीचे बालकडू लहानपणापासून दिलेशाहिर बाबूसिंह राजपूत कलामंचाच्या माध्यमातून हे कार्य महाराष्ट्रभर अविरतपणे सुरू ठेविले आहे. 


.पू.शुकदास महाराजश्रीं कडून शाबासकी  कौतुकाची थाप
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजश्री हे कलेचे चाहते  कलावंताची कदर करणारे होतेयुवा शाहिर विक्रांतसिह राजपूत यांच्यातील गुण ओळखून कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजश्रींनी विवेकानंद जन्मोत्सव २०१६ च्या विवेकानंद जन्मोत्सवाच्या तीनही दिवसाच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी युवा शाहिर विक्रांतसिह राजपूत याचे सोपविली  विक्रांतqसहने सुध्दा ती तितक्याच समर्थपणे पार पाडलीमहाराजश्रींच्या अनिवासी यांचा निवास याठिकाणी अनेक वेळा कार्यक्रमांच्या माध्यमातून दोन्ही पिता पुत्रांच्या पाठीवर शाबासकीची  कौतुकाची थाप दिली.



संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८