Responsive Ads Here

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !


श्रीरामप्रभु ऐकती कुश लव रामायण गाती...सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी... उगा कां काहिज माझें उले?  पाहूनी वेलीवरची फुलें.... दशरथा घे हें पायसदान तुझ्या यज्ञ मी प्रगट जाहलें हा माझाा सन्मान...दाने प्रहरीं का शिरीं सूर्य थांबला? राम जन्मला सखी राम जन्मला...रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त जाहले...आकाशीशीं जडले नातें धरणीमातेचे स्वयंवर झालें सीतेचे...राम चालले तो तर सत्पथ थांब सुमंता थांबवि रे रथ... दैवजात दुःख भरतां दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...यासारखी एकापेक्षा एक सरस गीतरामायणातील गीतांनी हिवरा आश्रम येथील श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर स्वरप्रभू सुधीर फडके महाराष्ट्राचे वाल्मिकी दि माडगूळकर जन्मशताब्दीनिमित्त संस्कार भारती चिखली परिवाराच्या वतीने गुरूवारी ता. रोजी गीतरामायणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात श्रीराम,स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
संस्कार भारती विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य महेश वाधवाणी, चिखली शाखेचे अध्यक्षा सौ.ज्योतीताई भवरउपाध्यक्षा सौ गौरी ठोसरसचिव श्री निळकंट अवटीमार्गदर्शक.सौ कविता लंके यांच्या मार्गदर्शनखाली  संस्कार भारतीच्या चमूने विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर गीतरामायणाचे सादीकरण केले.
यावेळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांच्या हस्ते संस्कार भारतीच्या पदाधिकारी,गायक वृंदाचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सौ. ज्योती भवर,सौ. गौरी ठोसर.निळकंठ आवटी.सौ .कविता लंके.अ‍ॅड. विजयकुमार कस्तुरे,सौ.मनीषा बोंद्रे, सौ.माधुरी विद्वांस,सौ निलमा कुलकर्णी,डॉ. श्रीनिधी राजे,अशोक जैन,सौ.आरती सकळकळे, नितीन सकळकळे,सौ.अनिता कुलकर्णी,सौ. राजश्री देशपांडे,सौ. मुक्ता भालेराव, सौ. मुग्धा खेकाळे,कु.स्वरा खेकाळे, कु.पूनम तांबोळे, कु अनुराधा तांबोळे, श्रुती कुलकर्णी यांनी सुमधूर गीते सादर केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेकानंद आश्रमाचा संगीत विभाग संस्कार भारती चिखली चे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला हार्मोनियम राजेंद्र डांगे तर तबला शशीकांत उदावंत यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव संतोष गोरे,सुत्रसंचालन ज्योतीताई भंवर तर आभार प्रदर्शन यांनी केले.

गीत रामायनाने हिवरा नगरी मंत्रमुग्ध
चिखली येथील संस्कार भारतीच्या चमूने विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर गीतरामायणाचे सादीकरण केले.यावेळी संस्कार भरतीच्या गायक चमूने गीतरामायणातील  सादर  केलेल्या गीतांनी हिवरा आश्रम येथील श्रोते मंत्रमुग्ध झाले.


विदर्भाच्या ५१ गावात सादरीकरण
गेल्या १५ वर्षापासून संस्कार भारतीच्या वतीने गीतरामायणांचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आहे.यावर्षी सुधीर फडके गदिमा जन्मशताब्दीनिमित्त विदर्भातील एकुन ५१ गावात १५१ दिवशी नृत्यमय गीत-रामायण सादर होणार असून १००० गायक, वादक, नृतिका, सह कलावंत हजेरी लावणार आहेत.

गीतरामायणाने महाराष्ट्राला वेड लावले
सुधीर फडके यांचे कर्णमधूर संगीत,सुश्राव्य वाणीतून साकारलेल्या गीतरामायणाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. गीत रामायणाच्या माध्यमातून सुधीर फडके व गदिमा महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहचले. रामकथेच्या अनेक वैविध्यमय गीतांनी मराठी भाषिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. गदिमानी गीतरामायणाच्या माध्यमातून महाकाव्याला साधे सोपे बनवले व सामान्यांच्या जीवनाशी त्याचे नाते अजरामर केले.



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

२ टिप्पण्या: