Responsive Ads Here

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

संगीत श्रीरामकथेत रमणार विवेकानंद नगरी


 विवेकानंद आश्रमाचे संस्थापक  कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराजांंच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त विवेकानंद आश्रम  भरगच्च धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रसिद्ध रामायणाचार्य हभप. रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य संगीत श्रीराम कथेचा भाविकांना लाभ होणार आहे. बुधवारी (ता.१०) या समाधी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. तर ता.१३ रोजी या सोहळ्याची हजारो महाप्रसाद वितरणाचे सांगता होणार आहे.  संजीवन समाधी सोहळ्याचे हे तृतीय वर्ष असून, राज्यभरातील भाविक या सोहळ्यास हजेरी लावणार असल्याची माहिती आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना दिली.
तसेच, १० ते १३ एप्रिल दरम्यान दररोज रात्री ८ ते १० वाजेदरम्यान प्रसिद्ध कीर्तनकारांचे हरिकीर्तन पार पडणार आहेत. तर दि.१० एप्रिल रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. कान्होबा महाराज देहूकर, दि.११ एप्रिल रोजी हभप. अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, दि.१२ एप्रिल रोजी पांडुरंग महाराज गिरी-बावीकर (नाशिक),दि. १३ एप्रिल रोजी हभप. रामराव महाराज ढोक तर शेवटच्या दिवशी दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजे दरम्यान वेदांताचार्य हभप. गजाननदादा शास्त्री महाराज यांचे प्रवचन व त्यानंतर स्वामी विवेकानंद जीवनचरित्राच्या अभ्यासिका डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. १३ एप्रिल रोजी दुपारी एक ते तीन या वेळात राज्यभरातून आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तीनही दिवस दररोज सकाळ व संध्याकाळी सात वाजता प्रार्थना, प्रवचन होणार असून, सकाळी ९ व दुपारी दोन वाजता पसायदान प्रवचनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

श्रीराम कथेचे आयोजन
रामायणाचार्य हभप. रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य संगीत श्रीराम कथेचे दिनांक ११ व १२ एप्रिल रोजी सकाळी ११ ते २ व दुपारी साडेतीन ते साडेसहा वाजेदरम्यान आयोजन करण्यात आले असून, १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते १ व दुपारी साडेतीन ते साडेसहा वाजेदरम्यान श्रीराम कथा पार पडणार आहे.

महाप्रसादाने होणार सोहळ्याची सांगता
प्रसिद्ध रामायणाचार्य हभप. रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य संगीत श्रीराम कथेचा भाविकांना लाभ होणार आहे. बुधवारी (ता.१०) या समाधी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. तर ता.१३ रोजी या सोहळ्याची हजारो महाप्रसाद वितरणाचे सांगता होणार आहे. 
  
कर्मयोगी प. पू. शुकदास महाराजांनी विवेकानंदांचा शाश्वत वेदान्त प्रत्यक्ष जीवनात उतरविला आणि भारतीयांनाही या संदेशाची पुर्नआठवण करून दिली. समृद्ध, संपन्न राष्ट्रनिर्मितीसाठी शुकदास महाराजश्रींचे विचार हे काळाची गरज आहे. विवेकानंद आश्रमाच्या विचारपीठावरून याच विचारांचा जागर होणार असून, त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी उपस्थित राहावे. 
                                       आर.बी.मालपाणी,अध्यक्ष विवेकानंद आश्रम 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा