Responsive Ads Here

शनिवार, २७ एप्रिल, २०१९

विवेकानंद आश्रमाच्या अन्नपुर्णेत सेंद्रीय भाजीपाल्याला प्राधान्य


रासायनिक खते किटक नाशकांचा अतिरेकी वापर सेंद्रीय शेती करण्याकडे  कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी प्राधान्य दिले. गोर गरीबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत पोष्टीक,सकस अन्न मिळावे या हेतूने कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असा अन्नपुर्णा विभाग सुरू केला. या विभागात तीस ते चाळीस कर्मचारी करीत असून  विवेकानंद ज्ञानसंकुलातील विविध शाळा, महाविद्यालयांतील वसतीगृहात राहून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी या अन्नपुर्णा विभागात सकस अन्नपदार्थ तयार केले जातात. विशेष बाब म्हणजे, भाजीपाला हा सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला वापरला जातो. आश्रमाच्या अन्नपुर्णा विभागात दररोज दोन क्विंटल भाजीपाला वापरला जातो. त्यात पालक, फुल फळ कोबी, वांगे, मेथी, शेपू यांचा समावेश असतो. विशेष बाब  सेंद्रीय भाजीपाला विवेकानंद आश्रमाच्या शेतातच पिकविण्यात आलेला असतो. क्विचित प्रसंगी तो बाजारपेठेतून खरेदी केला जातो. महिन्याकाठी सरासरी ६० क्विंटल भाजीपाला लागत असतोविद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक वाढीसाठी सकस, सेंद्रीय पौष्टिक अन्नाच्या निर्मितीत अजिबात कसर केली जात नाही.
वाढत्या वयातील विद्यार्थ्यांना पुरेसे पोषणमूल्ये मिळतील, याची काळजी घेतली जाते. जेणेकरून  विद्यार्थी-विद्यार्थिनींची शारीरिक मानसिक वाढ योग्यरित्या होईल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण हे विवेकानंद आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.
विवेकानंद आश्रमाद्वारे संचालित ज्ञानसंकुलात विवेकानंद विद्या मंदीर ज्युनिअर कॉलेज, विवेकानंद कृषी कृषी व्यवस्थापन महाविद्यालये, विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची शाळा, कॉन्व्हेंट  आदी शैक्षणिक संस्थांचा समावेश होतो. या सर्व शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्यासाठी सरासरी तीन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी या वसतीगृहात निवासी असतात. या विद्यार्थी -विद्यार्थिनींना अतिशय माफक दरात भोजन सुरक्षित, सुविधापूर्ण निवासाची सोय विवेकानंद आश्रमाच्या वतीने करण्यात येते.

महिन्याकाठी लागतो ६० क्विंटल भाजीपाला
आश्रमाच्या अन्नपुर्णा विभागात दररोज दोन क्विंटल भाजीपाला वापरला जातोत्यात पालकफुल  फळ कोबीवांगेमेथीशेपू यांचा समावेश असतोविशेष बाब  सेंद्रीय भाजीपाला विवेकानंद आश्रमाच्या शेतातच पिकविण्यात आलेला असतोक्विचित प्रसंगी तो बाजारपेठेतून खरेदी केला जातोमहिन्याकाठी सरासरी ६० क्विंटल भाजीपाला लागत असतो

विद्यार्थ्यांचे आध्यात्मिक प्रबोधन
विवेकानंद आश्रमाच्या अद्यावत अन्नपुर्णा विभागात एकाच वेळी  हजार विद्यार्थ्यांना भोजन दिले जाते. भोजना अगोदर अन्नसंस्कार केले जातात. भोजनापूर्वी विविध संस्कृत सुक्ते, गीतेतील अध्याय आणि आध्यात्मिक प्रबोधन केले जाते. या उच्च आध्यात्मिक वातावरणात हे अन्न सेवन करतात.

विवेकानंद आश्रमाची दिडशे एकर शेती असून, या शेतीत सेंद्रीय खतांचा वापर करून रासायनिक कीड आणि कीटकनाशके यांचा वापर टाळून केवळ नैसर्गिक पद्धतीने पिकविण्यात आलेला सकस भाजीपाला वापरण्यात येतो. त्यासाठी या शेतात ग्रीन हाऊस शेडनेटची सुविधा करण्यात आलेली आहे.
                                                                                संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम


संतोष थोरहाते

पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा