निवडणूक बंदोबस्तासाठी तैनात महिला पोलिसांची आश्रमात मोफत सोय


कडाक्या-चा उष्मा सोसत लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात चोवीस तांस खडा पहारा देणा-या पोलिस कर्मचा-यांच्या निवास व भोजनाचा मोठा प्रश्न राज्यभर निर्माण झाला असताना, या कर्मचा-यांना कामाचा अतिरिक्त ताण, वेळेवर जेवण नाही, झोप नाही, राहण्याची सोय नाही ही बाब पाहाता, विशेष करून महिला पोलिसांची होणारी कुचंबणा लक्षात घेता, विवेकानंद आश्रमाच्या वतीने सर्व सोयींनी युक्त अशा मुलींच्या वसतीगृहाच्या खोल्यांत तब्बल ५३ महिला पोलिसांची सोय करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस ५३ महिला पोलिस भागीनींची सोय विवेकानंद आश्रम अगदी मोफत करणार  आहेत  तसेच या नंतरही निवडणूक पार पडेपर्यंत प्रशासनास वेळोवेळी लागणारे सहकार्य आश्रम करणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी दिली आहे. 
बुलडाणा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यासाठी पोलिस रात्रंदिवस सुरक्षेसाठी तैनात आहेत. नुकतीच नागपूर व इतर भागातील तैनात पोलिसांची दैनावस्था प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणली होती. या पोलिसांना जेवण, राहण्याची सोय नसल्याने त्यांची मोठी कुचंबणा होत आहे. खास करून महिला पोलिसांचे अतोनात हाल होतात. ही बाब लक्षात घेता, मेहकर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे व पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी मेहकर तालुक्यात तैनात पोलिस कर्मचाèयांची विवेकानंद आश्रमात राहण्याची सोय होईल का, अशी विचारणा विवेकानंद आश्रमाकडे केली होती. त्याला आश्रमाच्या विश्वस्त मंडळाने लगेच होकार देत केवळ राहण्याचीच नाही तर भोजनाचीही अगदी मोफत सुविधा देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ५३ महिला पोलिसांची लगेचच आश्रमाच्या मुलींच्या वसतीगृहात भोजन व निवासाची सोय करण्यात आली.  
५३ महिला पोलीसांची केली निवास भोजनाची सुविधा
मेहकर तालुक्यातील मतदान केद्रावर बंदोबस्त साठी तैनात असलेल्या ५३ महिला पोलीस भगिनींची निवास भोजनाची सुविधा विवेकानंद आश्रमाने केली आहे. 
विवेकानंद आश्रमाने उचलाला मोलाचा वाटा
विवेकानंद आश्रमात आलेल्या महिला पोलीस भगिनींना वेळेवर भोजन, निवासाची सर्वसोयींनीयुक्त आरामदायक व्यवस्था व पिण्यासाठी आरओचे शुद्ध  पाणी हे अगदी मोफत पुरविण्यात आले आहे. यानिमित्ताने विवेकानंद आश्रमाने राष्ट्रीय कार्यात मोलाचा वाटा उचलला आहे. 

बुलडाणा जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तोपर्यंत किमान दिडशे कर्मचारी बंदोबस्तासाठी येण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस आश्रम या कर्मचा-यांना सोयीसुविधा पुरविणार आहे. बंदोबस्ता दरम्यान एखाद्या पोलिस कर्मर्चायाचे आरोग्य बिघडल्यास त्यांना वैद्यकीय सुविधाही पुरविली जाणार आहे. 
                                                                    संतोष गोरे सचिव विवेकानंद आश्रम 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा