डॉ.बाबासाहेब
आंबेडकर हे सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांनी भ्रष्टाचार,अनीती,अत्याचार,अन्यायाचा प्रखर विरोध केला. जातीभेदाच्या ते विरोधात होते.
जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड असे ते मानत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
म्हणजे अज्ञानी लोकांना बौध्दिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र
देणारे एक पथदर्शक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेची ज्योत पेटविली असे
प्रतिपादन विवेकानंद कर्णबधिर विद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी बोलतांना
केले.
कर्मयोगी संत
प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिरात भारतीय राज्य घटनेचे
शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते
बोलत होते.कार्यक्रमाची
सुरूवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन
करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्या मंदिराचे प्राचार्य प्रा.कैलास भिसडे तर प्रमुख
पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे,उपमुख्याध्यापक अशोक गि-हे,पर्यवेक्षक
आत्माराम जामकर,देवेंद्र मोरे
तथा आदि उपस्थित
पुढे बोलतांना
प्राचार्य शेळके म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे नुसते पुस्तकी पंडीत नव्हते तर
त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली. डॉ.बाबासाहेबांनी
आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. मनुष्याच्या जीवनातील दुःख,दारिद्रय आणि कष्ट
दूर करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा वापर केला. रंजल्या गांजल्या जनतेच्या उध्दासाठी
आपले आयुष्य वेचले. मानवतेची दिव्य ज्योत पेटविली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रेरक,उध्दारक आणि तारक
शक्ती होती असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन शिक्षक सुजित दिवटे तर आभार भगवान आत्माराम जामकर यांनी मानले.
संतोष थोरहाते
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा