Responsive Ads Here

शनिवार, ३० जून, २०१८

कृषीपृत्रांचे बळीराजासाठी इन्फार्मेशन कॉर्नर !


शेतकरी बांधवांसाठी आधुनिक शेती संबधी माहिती,शेतीकरी यशोगाथाशेती पुरक व्यवसाय माहिती,किड व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन,बागायती शेती,पशू पालन,फळबाग लागवड या संबंधी शेतक-यांना माहिती होण्या च्या  दृष्टीनेविवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कृषीपुत्र ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात लव्हाळा येथे परिसरातील बळीराजासाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर सुरू केले आहे.

यावेळी सरपंच दिनकर कंकाळ,उपसरपंच अमोल गारोळे,संदीप सवडतकर,दिपक लहाने,जगनराव कंकाळ,दत्ता काळे,चंद्रभान लहाने,दत्तात्रय कंकाळ,श्रीकृष्ण लहाने,संतोष कंकाळ,अशोक गारोळे,भगवान लहाने यांचे सह परिसरातील शेकडो शेतकरी बांधवउपस्थित होते.
 भारत हा देश  कृषि प्रधान देश म्हणून ओळखला जातोदेशातीत नागरीक शेती  शेतीशी संबंधी रोजगारावर अवलंबुन आहेशेतक-यांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीची उत्पादकता  उत्पन्न वाढवावेशेतीच्यासमृध्दीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे.
पारंपरिक पद्धतीने पीक घेण्याच्या पद्धतीमुळे पिकाचे उत्पन्न कमी येते म्हणून शेतक-यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते.  देशातील  साक्षर पिढी शेती व्यवसायात उतरत आहे.  त्यामुळे  शेतीमध्ये विविधप्रयोग करून शेतीचे उत्पन्नात वाढ होत आहेशेतीमध्ये झालेले संशोधन  शेतक-यांनी अवलंब केलेले संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान या गोष्टींमुळे शेतीचा विकास होईलयांत्रिकीकरणाच्या वापरामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होऊन  कामाची गुणवत्तासुधारतेयामुळे पारंपारिक शेतीमध्ये बदल करून तुषार,ठिबक सिंचनाच्या साहयाने बागायती शेती करावी अशी माहिती यावेळी शेतकरी बांधवांना देण्यात आली.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी पुत्र ग्रुप मध्ये सागर सोमटकरप्रसाद घरपाहुणेवैभव जाधवअजय चिंचोलेऋषीकेश शेळकेआकश ढोणेअमारासाई तेजाराजशेखर मिटूसाईसतिष या विद्यार्थ्यांचा समावेश आहेविवेकानंद कृषीपुत्र ग्रुपच्याविद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

शेतकरी  बांधवांसाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर अत्यंत महत्वपूर्ण आहेशेतकरी बांधवांना  या फलकाच्या माध्यमातून विविध उपयुक्त माहिती देण्याची व्यवस्था विवेकानंद कृषीपुत्र  ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
                                                                    डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय

इन्फॉर्मेशन कॉर्नर च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल .  या फलकावरील   माहिती नियमित अद्यावत करण्यात येणार आहे.
                                                        सागर सोमटकरविवेकानंद कृषी महाविद्यालय

संतोष थोरहाते 
पत्रकार दैनिक सकाळ 
मो.९९२३२०९६५८
'श्रीनिवास' विवेकानंद नगर हिवरा आश्रम 
ता,मेहकर जि.बुलडाणा

संतोष थोरहाते : चला, बनूया स्मार्ट ! ''फुल टू स्मार्ट'' च्या सोबती...

संतोष थोरहाते : चला, बनूया स्मार्ट ! ''फुल टू स्मार्ट'' च्या सोबती...: दैनिक सकाळ समूह हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतो. दैनिक सकाळ समूह हा शालेय दशेपासूनच विद्यार्थ्यां...

शुक्रवार, २९ जून, २०१८

चला, बनूया स्मार्ट ! ''फुल टू स्मार्ट'' च्या सोबतीने !!


दैनिक सकाळ समूह हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतो. दैनिक सकाळ समूह हा शालेय दशेपासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावीज्ञानार्जनातील निर्भेळ आनंद त्यांना सहज लुटता यावालहानग्यांच्या बालमनावर वाचनाचे संस्कार रूजवून त्यांची ज्ञानसंपदा वृध्दींगत करण्याकडे भर देत आहे. आपल्या पाल्याच्या ज्ञानसंपदेत भर पाडण्याच्या दृष्टीने सकाळ समूहाने ''फुल टू स्मार्ट'' हे ज्ञानवर्धक सदर सुरू केले आहे.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात आपल्या पालक टिकावा ही प्रत्येक पालकाची मनोमन इच्छा असते. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अभ्यासासोबत अवांतर वाचनाला सुध्दा तितकेच महत्व आहे. अवांतर वाचनाने ज्ञानात भर पडते. हा उदात्त हेतू डोळयासमोर ठेवून दैनिक सकाळ समूहाने दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ''फुल टू स्मार्ट'' उपक्रम सुरू केला आहे. शैक्षणिक अभ्यासासोबतच भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासाठी हा उपक्रम निश्चित मदत करणार आहे.
''फुल टू स्मार्ट'' मुळे विद्यार्थ्यांतील जिज्ञासा,चिकित्सा व बुध्दिमत्तेचा विकास होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाची गोडी निर्माण करणार आहे. दैनिक सकाळ समूह हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोपरी अग्रसेर आहे.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना अग्रोवन वितरण प्रतिनिधी अकोला जिल्हा सचिन अवसरमोल,हिवरा आश्रम प्रतिनिधी संतोष थोरहाते यांनी ''फुल टू स्मार्ट'' ची माहिती दिली. दैनिक सकाळ समूहाच्या या उपक्रमामध्ये मोठया संख्येने सहभागी होण्यासाठी सांगीतले. यावेळी विद्यार्थ्याचा उत्साह दिसून आला. यावेळी विवेकानंद विद्या मंदिराच्या प्राचार्य अणाजी सिरसाट यांना ''फुल टू स्मार्ट'' ची सुध्दा माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांसाठी बक्षिसांचा खजिना
विद्यार्थी मित्रांनोतुमच्यासाठी खूशखबर ! माहितीचा आणि त्याचबरोबर बक्षिसांचा मोठा खजिना तुमच्यासाठी पुन्हा खुला होत आहे. सातत्याने नवनवीन माहिती देणारा सकाळ समूह तुमच्यासाठी माहितीमनोरंजनाचा खजिना असलेले 'फुल टू स्मार्ट'' हे पान व बक्षिसे मिळवून देणारी स्पर्धा घेऊन येत आहे. विविध विषयांवरील माहिती वेगवेगळ्या सदरांतून वाचायला मिळेल. 'फुल टू स्मार्ट'' मधून ज्ञानार्जन सोबत बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. सकाळ फुल टू स्मार्ट मधील लेख वाचून त्या प्रश्नांची उत्तरे देवून फक्त ८० कूपन चिकटावे लागणार आहेत. 'फुल टू स्मार्ट''  मधील सहभागी विद्यार्थ्यांना स्पोर्टस बँग आणि प्रमाणपत्र मिळणार आहे. 'फुल टू स्मार्ट''  मधील प्रश्नांची उत्तरे देवून आपला पाल्य बक्षिसे सुध्दा जिंकणार आहे.

''फुल टू स्मार्ट'' ज्ञानवर्धक सदर
आपल्या पाल्याच्या ज्ञानसंपदेत भर पाडण्याच्या दृष्टीने सकाळ समूहाने ''फुल टू स्मार्ट'' हे ज्ञानवर्धक सदर सुरू केले आहे. ''फुल टू स्मार्ट'' मध्ये लहान मुलांच्या ज्ञानकक्षा वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने सुविचारदिनविशेष ,हास्यकट्टाकिलबिलटेक्नो हंटकीप फिटस्लॅम बुक अशी ज्ञानवर्धक सदरे वाचायला मिळणार आहेत. मुलांना मिळणार ज्ञानाचा खजिना,सव्वा कोटींच्या बक्षिसांचा नजराणा! ''फुल टू स्मार्ट'' पाडणार आपल्या लहानग्यांच्या ज्ञानसंपदेत भर !

संतोष थोरहाते 
पत्रकार दैनिक सकाळ 
मो.९९२३२०९६५८
'श्रीनिवास' विवेकानंद नगर हिवरा आश्रम 
ता,मेहकर जि.बुलडाणा

कळंबेश्वर येथे विद्यार्थी घेतात हसत खेळत शिक्षण


शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी या हेतूने ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून येथूनच जवळ असलेल्या जिल्हा परिषद कळंबेश्वर या शाळेचे सर्व वर्ग डिजीटल क्लासरूममध्येबदलेले आहेत. जिल्हा परिषद कळंबेश्वर मराठी प्राथमिक शाळा डिजीटल झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हसत खेळत शिक्षण घेणे सोपे झालेआहे. कळंबेश्वर येथील जि..शाळेच्या सर्ववर्ग खोल्या ग्रामपंचातीच्या आर्थिक साहय्याने डिजीटल झाल्या आहेत. कंळबेश्वर येथील डिजीटल क्लासरूमचे उदघाटन दि. १२ जून रोजी करण्यात आले. यामध्ये  संच संगणक,  एलईडी संच,प्रोजक्टर,आर. मशिन,विविध खेळांचे साहित्य,कपाट सात नग याचा समावेश आहे.
या डिजीटल क्लासरूम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विष्णु मगर हे होते तर उदघाटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण अवचार,उपाध्यक्ष दिपक मिसाळ,तंटामुक्तीअध्यक्ष पुंजाजी बो-हाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख संजय लामधाडेविभाग प्रमुख सदीप गायकवाड,ग्रा.पं.सदस्य डॉ. देविदास बो-हाडेगणेश कांबळेचिनकीराम सपकाळलक्ष्मण अवचारविठ्ठल चांगाडेभास्कर निकममहावीर अंभोरेकडुबा नाटेकरअमोल भराडनारायण कापसेशाळा समिती सदस्य समाधान निकम,गोपाळ साखळकर,गजानन चांगाडे,ओंकार शेवलकरविनोदभाकडे,गणेश भराड,अजित अंभोरे,जानकीराम बोरकर,आशीष मगर,भागवत गायकवाड,केशव पोपळघाट,हरिभाउ काळे,अरविंद अवचारतथा आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लामधाडे यांनी तर सुत्रसंचालन चांदणे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गायकवाड यांनी मानलेकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुसारी,महाकाळ अवचार,कदममॅडम,भागवत मॅडम यांनी परिश्रम घेतले.
शाळेचा झाला कायापालट
कळंबेश्वर येथील ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन जिल्हा परिषद शाळा डिजीटल केली आहेग्रामपंचायत डिजीटल प्रणालीचे साहित्य शाळेला उपलब्ध करून दिले आहे.  या डिजीटल प्रणालीसाहित्यासमध्ये तीन एईडीसंगणकाचे संच यांचा समावेश आहे.
डिजीटल शाळेमुळे विद्यार्थी हसत खेळत मनोरंजनातून शिक्षण घेत आहेशाळेत विद्यार्थ्यांना प्रोजक्टर व्दारे शिकविल्या जात असल्याने असल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी वाढली आहेविद्यार्थ्यांच्या पटसंख्येत सुद्धा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
                                                                             नामदेव गायकवाड,मुख्याध्यापक जि..शाळा कळंबेश्वर



संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कृषीदुतांकडून बीज उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक !


विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी साम्राज्य ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी  कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत येथूनच जवळ असलेल्या शेलगांव काकडे  येथे शेतक-या बीजउगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक करून  दाखविले.  शेतक-यांनी स्वतःकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन  बियाणे  पेरणीपूर्वी बियाण्यांची बीज उगवण क्षमता चाचणी तपासून घ्यावी. विवेकानंद कृषि महाविद्यालयाच्या कृषी साम्राज्य ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी कृषि  कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ग्राम शेलगांव काकडे  येथे शेतक-यांना बीज उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिककरून दाखविले. या कार्यक्रमाला  पांडुरंग काकडे, संतोष आव्हाळे, सुभाष आव्हाळे, गुलाबराव आव्हाळे, संतोष काकडे, पंजाबराव सरकटे, दत्तात्रय आव्हाळे   परिसरातील  शेतकरी मोठया संख्येनेउपस्थित होते. 
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी साम्राज्य ग्रुप मध्ये मध्ये चंद्रशेखर सावळेअश्विन आंभारेराजेश सावकेरोहन शिंदेपंकज निकसउमेश गायकीविनोद देशमुख विद्यार्थ्यांचा समावेशआहेविवेकानंद कृषि महाविद्यालयाच्या कृषी साम्राज्य ग्रुप चे विद्यार्थी   प्राचार्य डॉ.सुभाष कालवेप्रा.मनोज खोडकेप्रा.रविंद्र काकडयांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली विविध उपकरणाव्दारे शेतक-यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देत आहे.

अशी करा उगवण क्षमताचे चाचणी
प्रथम बियाण्यांची चाळणी करून त्यातील  काडीकचरा  बाजूला करावा.  ओल्या  गोणपाटामध्ये सोयाबीनचे १०० दाणे घेऊन एका ओळीत १० बिया याप्रमाणे १० ओळी मांडणी करावी.  गोणपाटओला राहण्यासाठी हलक्या प्रमाणात चार  ते  पाच दिवस पाणी शिंपडावे.  चार दिवसानंतर बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात जितक्या बियांना अंकुर फुटलेले दिसतील  तितकी   बियाणांचीउगवण क्षमता समजावी.

अशी घ्यावी बियाण्यांची काळजी
 बियाण्यांची साठवण करतांना ओलसर किंवा खताजवळ करू नये. सोयाबीन  प्रत्यक्ष पेरणी करतांना काळजी घेणे गरजेचे आहे त्यासाठी ७५ ते  १००   मीमी पर्जन्यमान   होण महत्वाचे आहे  बियाण्याची  पेरणी  ते  सेमीखोलीपर्यंत करावीसोयाबीनचे बाह्यआवरण  अत्यंत पातळ असून बियाण्यातील बीजांकुर  मूलद्रव्य हे बाहय आवरणालगत असलामुळे सोयाबीन बियाणेहाताळतांना काळजी घ्यावी.
  
उगवण क्षमताचे  चाचणी या पध्दतीचा अवलंब केल्यास शेतक-यांना बियाण्यांच्या खरेदीमध्ये ४० ते ४५ टक्के खर्च कमी होऊ शकतो.  यामुळे शेतीसाठी लागणा-या उत्पादन खर्चात कपात होऊशकते.

                                                                                            डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८