विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी साम्राज्य ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत येथूनच जवळ असलेल्या शेलगांव काकडे येथे शेतक-या बीजउगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतक-यांनी स्वतःकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यांची बीज उगवण क्षमता चाचणी तपासून घ्यावी. विवेकानंद कृषि महाविद्यालयाच्या कृषी साम्राज्य ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ग्राम शेलगांव काकडे येथे शेतक-यांना बीज उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिककरून दाखविले. या कार्यक्रमाला पांडुरंग काकडे, संतोष आव्हाळे, सुभाष आव्हाळे, गुलाबराव आव्हाळे, संतोष काकडे, पंजाबराव सरकटे, दत्तात्रय आव्हाळे व परिसरातील शेतकरी मोठया संख्येनेउपस्थित होते.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी साम्राज्य ग्रुप मध्ये मध्ये चंद्रशेखर सावळे, अश्विन आंभारे, राजेश सावके, रोहन शिंदे, पंकज निकस, उमेश गायकी, विनोद देशमुख विद्यार्थ्यांचा समावेशआहे. विवेकानंद कृषि महाविद्यालयाच्या कृषी साम्राज्य ग्रुप चे विद्यार्थी प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्रा.मनोज खोडके, प्रा.रविंद्र काकड, यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली विविध उपकरणाव्दारे शेतक-यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देत आहे.
अशी करा उगवण क्षमताचे चाचणी
प्रथम बियाण्यांची चाळणी करून त्यातील काडीकचरा बाजूला करावा. ओल्या गोणपाटामध्ये सोयाबीनचे १०० दाणे घेऊन एका ओळीत १० बिया याप्रमाणे १० ओळी मांडणी करावी. गोणपाटओला राहण्यासाठी हलक्या प्रमाणात चार ते पाच दिवस पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर बीजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात जितक्या बियांना अंकुर फुटलेले दिसतील तितकी बियाणांचीउगवण क्षमता समजावी.
अशी घ्यावी बियाण्यांची काळजी
बियाण्यांची साठवण करतांना ओलसर किंवा खताजवळ करू नये. सोयाबीन प्रत्यक्ष पेरणी करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ७५ ते १०० मीमी पर्जन्यमान होण महत्वाचे आहे. बियाण्याची पेरणी ३ ते ४ से. मी. खोलीपर्यंत करावी. सोयाबीनचे बाह्यआवरण अत्यंत पातळ असून बियाण्यातील बीजांकुर व मूलद्रव्य हे बाहय आवरणालगत असलामुळे सोयाबीन बियाणेहाताळतांना काळजी घ्यावी.
उगवण क्षमताचे चाचणी या पध्दतीचा अवलंब केल्यास शेतक-यांना बियाण्यांच्या खरेदीमध्ये ४० ते ४५ टक्के खर्च कमी होऊ शकतो. यामुळे शेतीसाठी लागणा-या उत्पादन खर्चात कपात होऊशकते.
संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा