मेहकर तालुक्यातील प्रती पंढरपूर म्हणून ओळख असणा-या देऊळगांव माळी येथील मगर कुटुंबीयांनी आईच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी रूढी,परंपरेला बाजूला सारत रक्षा नदीच्या पात्रात विसर्जीत न करता स्मशान भूमीत नऊ खड्डे खणून त्यामध्ये ही रक्षा व माती टाकून त्याठिकाणी नऊ वृक्षांचे रोपन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. या कामासाठी तरूणाई फांउडेशनेन अध्यक्ष पत्रकार कैलास राऊत यांनी पुढाकार घेतला.
मेहकर तालुक्यातील देऊलगांव माळी येथील शेतकरी भगवान महादुजी मगर यांच्या पत्नी तर पाटबंधारे विभाग येथे कार्यरत असलेले आश्रू मगर यांच्या आई वच्छलाबाई भगवान मगर यांचे मंगळवारी (दि.१७) रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ९० व्या वर्षी दु:खद निधन झाले. वच्छलाबाई यांना आश्रुजी, कुंडलिक व अनिल मगर असे तीन मुले व यशोदाबाई कुडके, पार्वतीबाई सपकाळ अशा दोन मुली असुन आहेत. वच्छलाबाई मगर यांच्या रक्षाविसर्जन प्रसंगी तरूणाई फाऊंडेशनचे अध्यक्ष पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलास राऊत व विश्वस्त नारायण बळी यानी पुढाकार घेऊन झाडे लावण्याची संकल्पना मगर परिवाराला दिली व त्यानुसार आश्रूजी मगर यांनी होकार देऊन स्मशान भूमीत पिंपळ,लिंब,वड,उंबर,या दिर्घ कालीन झाडाची लागवड विविध मान्यवराच्या हस्ते लागवड केली. यावेळी सरपंच शुभांगी मगर,वसंतराव मगर, माजी सरपंच अशोक गाभणे, किशोर गाभणे, पं.सदस्य शिवप्रसाद मगर, उपसरपंच विनोद फलके, शाम इंगळे ,सचिन मगर, भगवान मगर, विजय राजगुरू, संजय देशमाने, अशोक मगर यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजगुरू यांनी केले तर आभार राजेश मगर यांनी मानले.
वृक्षसंगोपनाची मगर कुटूंबीयांनी घेतली शपथ
मगर कुटूंबीयांनी आईच्या रक्षाविसर्जन प्रसंगी ९ वृक्षांची नुसती लागवडच केली नाही तर त्यांचे संवर्धन व संगोपन करण्याची सर्वस्वी जबाबदारी घेण्याची शपथ यावेळी घेतली. मगर परीवारातील सदस्यांनी लागवड केलेल्या झाडाची संपुर्ण संगोपनासाठी उचलेले सामाजिक पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे.
वृक्ष सवंर्धनासाठी कटिबध्द रहा!-हभप श्रीकृष्ण महाराज मोरे
वृक्ष हा पर्यावरणातील महत्वाचा घटक असून पर्यावरण अबाधित राखण्यासाठी महत्वाची भूमीका पार पाडतो. वृक्षाची उपरोपकारी वृत्ती ही समाजातील प्रत्येकासाठी तितकीच महत्वाची आहे. पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी वृक्षतोड थांबवा! वृक्ष सवंर्धनासाठी कटिबध्द रहा! असा मौलीक संदेश यावेळी हभप श्रीकृष्ण महाराज मोरे यांनी उपस्थितांना दिला.
संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा