Responsive Ads Here

गुरुवार, २८ जून, २०१८

पिकांच्या उगवण क्षमतावाढीसाठी करा बीज प्रक्रिया!


 विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी समृध्दी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हिवरा आश्रम येथे शेतक-यांना बीज प्रक्रिया म्हणजे काय. बीज प्रक्रिया का करावी. बीज प्रक्रीयेचे फायदे. याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
शेतकरी बांधंवांनी बियांण्याची शेतात पेरणी करण्यापूर्वी त्या बियाण्यांवर बीज प्रकीया करणे आवश्यक असतेबीज प्रक्रीया केलेल्या बियाण्यांची पेरणी केल्यास उत्पादन वाढीसाठी मदत मिळतेबीज प्रक्रिया केल्याने रोगजंतूचे संक्रमण होवून बी कुजणे,अंकुरण,व्यवस्थीत  होणे,यासारख्या विकृती होत नाही.बिज प्रक्रिया केल्यामुळे रोगांचे प्राथमिक अवस्थेत निर्मूलन झाल्याने खर्चात मोठया प्रमाणात बचत होतेकृषी समृध्दी ग्रुपमध्ये कु.कल्याणी पाटील,कु.मोनिका चव्हाण,कु.प्रिया मवाळ,कु.एन.एस.प्रियंका,कु.मनिषा चव्हाण,कु.प्रतिक्षा धोंगडे,कु.पुजा झाल्टे,कु.कोमल काळदाते,कु.संपदा पडघान,कु.अमृता बोम्मा,कु.उज्वला काकडे  या विद्यार्थीनींचा समावेश आहेकृषी समृध्दी ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके,प्रा.व्ही.बी.हमाने यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
यावेळी विजय सराटे,अरूण शेळके,प्रविण पारदे,राजू पारधेप्रविण शेळके,कवेराबाई सराटे,उषा गारोळेमीरा डुकरेमुरलीधर शेळके, दत्तात्रय शेळके  परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

अशी करा बीज प्रक्रिया
सर्वप्रथम कोरडा जागेत ताडपत्री किंवा पोते घेवून बियाणे पातळ थरामध्ये पसरावे त्यावर किंचीत प्रमाणात पाण्याचा शिंपडा करून बियाणे ओले करावेत्यानंतर बियाण्यास लागणाया रासायनिक बुरशीनाशकांचे प्रमाण घेवून ते हलक्या हातोने बियाणे चोळून अर्धा तास सुकवावे.

बीज प्रक्रिया फायदे
बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनीतून  बियाणाव्दारे पसरणा-या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतोपिकांची उगवण क्षमता वाढतेपिकांची जोमदार वाढ होवून पिकांच्या उत्पादनात वाढ होतेबीज प्रक्रिया ही घरी सहज शक्य असल्यामुळे कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक वाढ होते.

ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना कृषी समृध्दी ग्रुपच्या वतीने बीज प्रक्रीया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आलेबीज प्रक्रिया प्रात्यक्षिक हे शेतकरी बांधवांनी केल्यास मोठा फायदा होतो.
                                कल्याणी पाटील,कृषी समृध्दी ग्रुप विवेकानंद कृषी महाविद्यालय



संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा