गेल्या आठ ते दहा दिवसापासून हिवरा आश्रम परिसरातील बीएसएनएल ची नेट सेवा विस्कळीत झाली आहे. सद्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेचे कामकाज ऑनलाईन झाल्याने इंटरनेट अभावी प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी,पालकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. महाविद्यालयीनविद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत विलंब होत आहे. नेट सेवा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना नैराशाचा सामना करावा लागत आहे.
हिवरा आश्रम हे जिल्हयातील मोठे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. राज्य व राज्याबाहेरून मोठया प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थींनी येथे प्रवेशासाठी चढाओढ करीत असतात. याठिकाणी कृषी विद्या शाखेची दोन महाविद्यालये आहेत. सद्यस्थितीत कृषी महाविद्यालयाची ऑनलाईन प्रवेश प्रकीया सुरू असल्याने इंटरनेट अभावी प्रवेश प्रकीयेत विद्यार्थ्यांना अनेक अडथळे येत आहेत. इंटरनेट अभावी शैक्षणिक तथा महत्वाच्या कामाकाजात आडकाठी येत आहे. नेट अभावी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा समाना करावा लागत आहे. ही नेट सुविधा कशामुळे बंद यासाठी सबंधित अधिका-यांशी दुरध्वनी द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. संबधीत अधिका-यांनी गांभीर्याने दखल घेवून विस्कळीत झालेली नेट सुविधा तातडीने सुरळीत करावी अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे.
शैक्षणिक प्रवेश प्रकीयेत अडचणी
मुक्त विद्यापीठाच्या विविध कृषी पदवीकेच्या प्रवेशसाठीची विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती ऑनलाईन अपडेड करावी लागत आहे. परंतु इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने त्याचा फटका अंदाजे ४० ते ५० विद्यार्थ्यांना होत आहे. इंटरनेट अभावी शैक्षणिक प्रवेश प्रकीयेत अडचणी येत आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत कृषी शिक्षण क्रमाची प्रवेश प्रक्रिया दि. १ जून ते १५ जून पर्यंत आहे. परंतु या दरम्यान गत सात आठ दिवसापासून बीएसएनलचे इंटरनेटची सेवा विसकळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांना कमालीचा मानसिक त्रास होवून अनेक प्रवेश प्रक्रीयेपासून वंचित राहण्याची संभावना आहे.
प्रा.मंगेश जकाते, केंद्र संयोजक विवेकानंद कृषी महाविद्यालय
नेट सुविधा विस्कळीत झाल्याने प्रवेश न झाल्यास शैक्षणिक सत्र वाया जाण्याची भिती वाटत आहे. प्रवेश प्रक्रीयेची अंतिम तारीख जवळ आली तरी सुध्दा नेट सुध्दा बंद असल्यामुळे मानसिक त्रास होत आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा