जीतूगा मै यह खुद से वादा
करो...जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो.., तकदीर भी रूठे पर हिम्मत न टुटे... मजबूत इतना अपना इरादा
करो... या कवीतेप्रमाणे लहापणापासून अभियंता होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या हिवरा
आश्रम येथील सौरभ देव भारती याने इयत्ता बारावीच्या परिक्षेमध्ये ८४ टक्के गुण
संपादन करून उत्तुंग भरारी घेत आई वडीलांचे स्वप्न साकार
केले आहे.
शिक्षण ही व्यक्तीमत्व
विकासातील महत्वाची पायरी आहे. शिक्षणाने वैचारिक व मानसिक विचारात आमुलाग्र बदल होतात. सौरभ भारती या विद्यार्थ्याने बाराबीच्या परीक्षेत ८४
टक्के गुण मिळवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सौरभ हा कर्मयोगी संत
प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या
मंदिराचा विद्यार्थी आहे. सौरभचे वडिल देव शिवराम भारती यांच्या घरची परिस्थिती
अगदी जेमतेम असून ते अल्पभूधारक व सोबत दुध विक्री करून कुटुंबाची उपजीविका
चालवितात. मुलाच्या उज्जव भविष्यासाठी आई वडीलांनी शेतीत कबाडकष्टात कुठलाच कसूर ठेवला नाही. आपल्या
मुलाच्या शैक्षणिक जीवनात आपली परिस्थिती कुठेही आड येउ नाही म्हणून शेतात काम
करून सौरभच्या वद्या,पुस्तके,कपडयांसाठी पैसे उभे केले. सौरभने सुध्दा आई वडिलांच्या स्वप्नांना आकार
देण्यासाठी कुठही कसर ठेवली नाही. रात्रंदिवस केवळ अभ्यासाचा ध्यास घेवून बारावीत
त्याला ८४ टक्के गुण मिळाले. सौरभने कुठल्याही खाजगी शिकवणी वर्गाशिवाय हे घवघवीत
यश मिळाल्याने परिसरात त्याचे कौतुक होत आहे. सौरभला गणित विषयात ९३ गुण तर मराठी विषयात ८७ गुण मिळाले आहे. अभ्यासातील
सातत्य,कठोर परिश्रम,चिकाटी व ध्येयप्रती एकनिष्ठता हे आपल्या यशाचे गमक असलयाचे दैनिक सकाळशी बोलतांना सांगीतले. नियमित शाळेत शिकविलेला अभ्यास,लेखन,वाचनावर भर देवून सौरभने बारावीच्या परिक्षेत ८४ टक्के गुण प्राप्त केले आहे.
मुळात लहानपणापसून सौरभला अभ्यासात आवड होती. सुटीचा दिवस आला की शेतात आईवडीलांना
सौरभ मदत करीत असे. सौरभच्या बारावीच्या यशा बद्दल त्याच्यावरती अभिनंदना सोबतच
कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यश मिळविण्यासाठी
अभ्यासातील सातत्य,कठोर परिश्रम व
ध्येयपूर्ती एकनिष्ठता अत्यंत महत्वाची
आहे. स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी जिद्दीने अभ्यास केला.यशाला कुठलाही
शॉर्टकट नसल्याचे माहित असल्यानेच सुरूवातीपासून अभ्यासवर लक्ष केंद्रित केले.
सौरभ भारती हिवरा आश्रम
संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
मो.९९२३२०९६५८
श्रीनिवास विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा