Responsive Ads Here

रविवार, १७ जून, २०१८

गरीब विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून उजळविली प्रकाशवाट !


होतकरू, हुशार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत प्रतिकूल परिस्थितीचा डोंगर अडसर ठरू नये म्हणून चिखली तालुक्यातील मिसळवाडी येथील मुख्याध्यापक प्रविण सुधाकर मिसाळ यांनी पवन कृष्णा कदम या गरीब विद्यार्थ्याच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून या गरीब हुशार विद्यार्थ्याची प्रकाशवाट उजळविली आहे. उरात आभाळाला गवसणी घालण्याची जिद्द...स्वप्नांना कवेत घेण्यासाठी  वाटेत येणा-या अडचणींचा डोंगर सर करण्याचा निर्धार...त्यासाठी वाटेल ती कामे करून शैक्षणिक प्रवास सुरूच ठेवायचा मनाशी पवनने केलेला निर्धार अखेर पुर्ण झाला. ही कुण्या नाटक किंवा  चित्रपटाची कथा नसून  प्रतिकूल परीस्थितीवर मात करून शिक्षण पूर्ण केलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील मंडपगांव चिंचखेड येथील पवन कृष्णा कदम याची आहे. पवन कृष्णा कदम याला इयत्ता दहावीच्या परिक्षेत ९०.२० टक्के गुण मिळाले असून या  होतकरू हुशार विद्यार्थ्याने प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत अखेर दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करून आपले स्वप्न पूर्ण केले. पवन चे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करितात. पवनच्या पुढील शैक्षणिक प्रवासात त्यांची गरीबी,हलाकीची परिस्थीतीची आडकाठी येवू नये म्हणून चिखली तालुक्यातील मिसळवाडी येथील मुख्याध्यापक प्रविण सुधाकर मिसाळ यांनी गरीब पवन कृष्णा कदम  याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून सामाजिक दायीत्व पूर्ण करीत समाजाला नवा संदेश दिला आहे. पवन कदम या विद्यार्थ्यानेकै.भाष्कररावजी शिंगणे विद्यालयाल मंडपगांव चिंचखेड ता.दे.राजा येथून दहावीची परिक्षा उत्तीण केली आहे. दहावीच्या परिक्षेत त्याला ९०.२० टक्के गुण मिळाले असून त्याला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले असून  तो या विद्यालयातून प्रथम आला आहे.

पवनचा सकाळ समूहाकडून सत्कार
हुशार,गुणवंत व होतकरू विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे  काम दैनिक सकाळ समूह अविरतपणे करीत आहे. दैनिक सकाळ समूहाने बुलडाणा येथे गुणवंतविद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले. या गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात शिक्षण अधिकारी माध्यमिक  श्रीराम पानझडे,सहयोगी संपादक संदीप भारंबे यांच्या हस्ते पवनचा प्रशस्तीपत्रस्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

पवनच्या घरची परिस्थिती अतिशय गरीबीची आहे. पवन हा लहानपणापासून हुशार आहे. पवन  सुट्टीच्या दिवशी व उन्हाळयात हाताला मिळेल ते काम करून त्या पैशातून आपला शैक्षणिक खर्च भागवितो. पवनचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्याच्या शैक्षणिक प्रवासात मदत केली.                                                                                                                                             प्रवीण सुधाकर मिसाळ,मुख्याध्यापक मिसाळवाडी

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा