Responsive Ads Here

मंगळवार, २६ जून, २०१८

मुलगी बघून अमोल ने केला साध्या पध्दतीने विवाह !



 विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील सुखद पण तितकाच आनंदाचा क्षण... आपल्या स्वप्नातील राजकुमारच्या भेटीचा हळवा क्षण म्हणजे विवाह... अग्नीच्या साक्षीने आपल्या साधीदारासोबत आयुष्यभर गुण्यागोविंदाने राहण्यासाठी घेतले वचन... कन्यादान करून वधुपित्याच्या चेह-यावर उजळणारा समाधानाचा क्षण म्हणजे              विवाह होय... पैशाच्या हव्याशापोटी वधु पेक्षा पैशाला प्राधान्य देवून बडेजाव करीत पैशाची उधळपट्टी करून विवाह करण्याच्या मानसीकतेला अपवाद व पारंपारीक पध्दतीला फाटा देत चि. अमोल व चि. सौ. कां. दिपाली यांचा विवाह रविवारी दि.२४ रोजी  विवेकानंद आश्रमाच्या हरिहर तीर्थावर पार पडला.
सिंदखेडराजा येथील गजानन यादवराव घाटोळकर हे हिवरा आश्रम येथील  संजय पंढरीनाथ सनान्से यांची जेष्ठ कन्या दिपाली हिला बघण्यासाठी  आले असतांना त्यांना मुलगी पसंत पडली. अमोलला मुलगी पसंत पडली. विवाहाची बोलणीसुरू असतांनाच विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर यांनी वरपित्याला सगळया रितीरिवाजाला फाटा देत आपण आजच लग्न समारंभ संपन्न केलातर छान होईल. प्रस्ताव मांडला लागलीच वर मंडळीकडून प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाली.
वरपिता व पाहूणे मंडळीनी तात्काळ मान्य करून विवाहाला पसंती दर्शविली. यामुळे अमोलने दिपालीशी  लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमोलच्या या निर्णयामुळे झट मंगनी पट ब्याह चा प्रत्यय हिवरा आश्रमवासीयांनी अनुभवला. 
धाड येथील मुळ रहीवासी असलेल्या संजय सनान्से यांच्या जेष्ठ कन्या दिपालीला सोयरीक आली. रीतीरीवाजाप्रमाणे मुलगा, मुलगी पसंगी झाली. आणि रविवारी दि. २४ रोजी चि. अमोल व चि. सौ. कां. दिपाली यांचा विवाह विवेकानंद आश्रमाच्या हरीहर तीर्थावर उपस्थितीत पाहूण्यांच्या साक्षीने अत्यंत साध्या पध्दतीने संपन्न  झाला. दिपालीचे शालेय शिक्षण विवेकानंद आश्रमाच्या विवेकानंद विद्या मंदिरात झाले. चि.अमोल व चि.सौ.कां.दिपाली यांच्या आदर्श विवाहामुळे परत आदर्श विवाह करण्याकडे तरूण मंडळीचा कल वाढल्याचे दिसून आले.

विवाहातील अनाठायी खर्चाला ब्रेक
चि. अमोल व चि. सौ. कां. दिपाली यांनी विवेकानंद आश्रमाच्या हरीहर तीर्थावर  सगळया खर्चाला फाटा देत अत्यंत साध्या पध्दतीने विवाह करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या आदर्श विवाहामुळे विवाहातीलअनाठायी खर्चाला एक प्रकारचा ब्रेक लागल्याचे दिसून आले.

आजच्या धकाधकीच्या जीवनात कमी वेळात व अल्पखर्चातच विवाह पार पाडावेत. आदर्श विवाह पध्दती ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक वरपित्याने साध्या पध्दतीने विवाह साजरा करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

                                                   डॉ.संजय रायमूलकर,आमदार मेहकर


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

1 टिप्पणी: