शिक्षक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी पुरूषोत्तम आकोटकर




मेहकर येथील विश्राम भवनावर आयोजित मेहकर तालुका  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सभेमध्ये जुनी तालुका कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली तर नवीन तालुका कार्यकारिणीचे पुनर्गठण राज्य नेते संजय जानराव दुनगु तसेच माजी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नेते प्रकाश सास्ते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेयामध्ये हिवरा आश्रम येथील शिक्षक तथा विवेकानंद आश्रमाचे विद्यमान विश्वस्त  पुरूषोत्तम रामभाऊ आकोटकर यांची तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.पुरूषोत्त आकोटकर हे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या सेवाकार्यात सदैव तत्पर असतात. तर तालुका सरचिटणीस पदी नंदकिशोर कुडके,कार्याध्यक्ष गजानन पाटील,उपाध्यक्ष विलास लांभाडे,हिरालाल डोंगरे,कोषाध्यक्ष गजानन सातपुते,संपर्कप्रमुख भीमराव सदार,राहुल डोंगरदिवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीया वेळी माजी विभागीय नेते सुनील मगर ,राजेंद्र वाघ जिल्हा नेते विलास ठाकरे आणि सुरेश चव्हाणअशोक ठाकरेसमाधान तोंडेभारत भराड,भारत फलकेकारभारी साळवेमोद निंबेकर उपस्थित होतेयावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी नवनिर्वाचित शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरूषोत्तम आकोटकर  यांचे शाळ,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आलायावेळी आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,विश्वस्त शशीकांत बेंदाडे,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,राज्य कार्यकारणी सदस्य संजय दुणगू,कृउबास संचालक दामु अण्णा गारोळे,दयानंद थोरहाते,पत्रकार संतोषबापू थोरहातेप्रा.पवन थोरहाते तथा आदी हजर होते.



शिक्षक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदाच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू. संघटनेने वेळोवळी टाकलेल्या जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू.
                                                      पुरूषोत्तम आकोटकर तालुकाध्यक्ष शिक्षक संघटना  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा