शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो.
शिक्षणा पासून समाजातील एकही व्यक्ती वंचित राहता कामा नये. श्रीमंतीने माणूस मोठा
होत नाही तर शिक्षणाने मोठो होतो. शिक्षणाने निर्भय जगण्याची ताकद मिळते असे विचार
विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी बोलतांना व्यक्त केले.
आश्रमाचे
सहसचिव आत्मानंद थोरहाते पुढे बोलतांना म्हणाले की, सुसंस्कृत शिक्षक ही
राष्ट्राची खरी संपत्ती आहे. शिक्षक शिकविता शिकविता विद्यार्थ्यांना आकाशाला
गवसणी घालण्याचे सामर्थ्य,शक्ती देतो. शिक्षक हा सभ्य,सुसंस्कृत समाजाची
निर्मिती करण्यासाठी सदैव झटत असतो. शिक्षक ज्ञानाचा स्त्रोतक असतो. शिक्षक आदर्श
तत्वज्ञ आणि मार्गदर्शन असतो असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. प्रा.जयप्रकाश
सोळंकी, प्रा.मनोज मु-हेकर, प्रा.गजानन ठाकरे,प्रा.किशोर गवई,प्रा.योगेश काळे, प्रा.कु.पल्लवी रायमूलकर,
प्रा.कु.मनिषा कुडके, प्रा.कु.पल्लवी मिटकरी, प्रा.कु.समता कस्तुरे,प्रा.प्रियांका वायसे यांचा यावेळी
शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन
गायकवाड, सूत्रसंचालन कु. शिवानी सोळंकी,कु.शिवानी रडाळ तर आभार प्रदर्शन कु. गीता
म्हस्के यांनी मानले.
संतोष श्री. थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा