स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषदेत ११ सप्टेंबर १८९३ रोजी व्यक्त केलेले विचार समाजाची सहिष्णुता,हृदयाची विशालता व एकात्मतेची भावना प्रतिqबत करतो. मी अठरापगड जातीचा प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झालो आहे. धर्मावरून जर माणसात संघर्ष होत असतील तर सर्वधर्मांना चालेल असा विश्वधर्माची निर्मिती करू या. जो विश्वधर्म सर्वांना एकत्र जोडेल व मानवातील संघर्ष व भेद नष्ट करेल असे विचार विवेकानंद आश्रमाचे सहसचिव तथा संत साहित्याचे अभ्यासक आत्मानंद थोरहाते यांनी बोलतांना काढले
विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणाला १२५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मंगळवारी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बी.डब्ल्यू.सावरकर तर प्रमुख पाहूणे विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे होते. आजच्या परिस्थितीत मनुष्य जातीयता,धर्मांधता,चंगळवाद यांनी ग्रस्त असून निष्कलंक व चारित्र्यसंपन्न जीवन जगल्याने आत्मबल वाढून उदिष्ट साध्य करता येते. मूलतत्ववादी व संकुचित सांप्रदायीकता या सुंदर वसुंधरेचा विनाश करेल व मानव जात हताश झालेली असेल. अशी धर्मांधता मानवी जीवनाला सुखी आणि आनंदी ठेवू शकणार नाही. म्हणून स्वामीजींनी केलेले धर्म चिंतन व मानवकल्याणाचे मार्गदर्शन भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगात शांतता निर्माण करू शकेल असे संतोष गोरे यांनी बोलतांना सांगीतले. यावेळी प्रा.जयप्रकाश सोळंकी, प्रा.मनोज मु-हेकर, प्रा.गजानन ठाकरे, प्रा.योगेश काळे, प्रा.कु.पल्लवी रायमूलकर, प्रा.कु.मनिषा कुडके, प्रा.कु.पल्लवी मिटकरी, प्रा.कु.समता कस्तुरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.धनश्री मोर तर आभार प्रदर्शन कु.पल्लवी शिंगणे हिने मानले.
संतोष उपाख्य बापूश्री थोरहाते
पत्रकार तथा संत साहित्याचे अभ्यासक
'श्रीनिवास', विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा