Responsive Ads Here

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

देऊळगाव माळीच्या पिता पुत्रांनी फुलविली गुलाब शेती




पारंपारीक शेतीच्या चौकटीतून बाहेर पडून ग्रामीण भागातील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असल्याचे विद्यायक चित्र दिसून येत आहे. जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची तयारी ठेवल्या अपारंपारीक शेती सुध्दा यशस्वीपणे करता येते. याचाच प्रत्यय  मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील व्यवसायाने कुंभार असलेल्या अल्पभूधारक शेतकरी हरिभाऊ राजाराम राऊत यांनी दाखवून दिले आहे. दिवसेंदिवस निसर्गाच्या अवकृपेचा फटका शेतक-याला सहन करावा लागत असतांना मात्र या बिकट परिस्थितीत सुध्दा न डगमगता घामाच्या धारांनी व कष्टांनी हरिभाऊ राऊत व कैलास राऊत या पिता पुत्रांनी गेल्या चार ते पाच वर्षापासून गुलाबशेतीत आपले पाय भक्कमपणे रोवत ही शेती यशस्वी केली आहे. पाण्यासोबत संघर्ष करीत गुलाबासह शेवंती,निशीगंध,मोगरा,झेंडू आदी फुलांच्या उत्पादनातून त्यांनी कुटूंबाची आर्थिक प्रगती साधली आहे.
हरिभाऊ राऊत यांनी  ३० गुंठयात गुलाबाची लागवड केली. आधुनिक पद्धतीने त्यांनी ही गुलाबाची शेती फुलवली आहे. नियोजनबद्ध मशागत आणि आधुनिक पद्धतीची लागवड यामुळे दर्जेदार गुलाबाचे पीक त्यांना मिळत आहे. शेतात पाण्याची सोय नसल्यामुळे ३५ लीटरच्या दोन कॅनानी दीड किलो मीटर वरून पाणी आणून झाडाना पाणी दिले. याशिवाय २०० मातीची मडकी व सलाईव्दारे गुलाबाच्या झाडाखाली ठेवून शेतातील गुलाबशेतीला ठिबकच्या माध्यातून संजीवनी दिली. आपल्या शेतातील फुलांची किरकोळ विक्री मेहकर,साखरखेर्डा,लोणार,जानेफळ,रिसोड येथील फुलभांडार विक्रेत्यांना करतात. हरीभाऊ राऊत यांना पत्नी शांताबाई राऊत,मुलगा कैलास राऊत शेतीमध्ये मदत करतात. हरिभाऊ राऊत यांना गुलाब शेती व फुलशेतीतून वर्षाला ८० ते ९० हजार रूपायाचे उत्पन्न मिळते. हरीभाऊ राऊत यांना मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट मुर्तीकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

गुलाबजल निर्मितीचा मानस
हरीभाऊ राऊत येणा-या काही वर्षात तीन एकरात गुलाशेती करणार आहेत. ग्रामीण भागात पहिला गुलाबजल निर्मीती करण्याचा त्यांचा मानस आहे. या गुलाबजल निर्र्र्मितीतून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल.

सद्या एका फुलाला एक रुपयाचा बाजारभाव मिळत आहे. दररोज दोन ते अडीच हजारांचे उत्पन्न मिळत आहे. ग्रामीण भागातील शेतक-यांनी फुलशेतीकडे वळल्यास आर्थिक उन्नती साधता येते.
हरीभाऊ राजाराम राऊत देऊळगांव माळी

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

लोकवर्गणीतुन शारदामाता गर्ल्स होस्टेल



तुम्ही मुली जगवा, मी त्यांना शिक्षण देतो, परंतु त्यांना गर्भात मारू नका, असे आवाहन करत स्त्रीभ्रूणहत्येला कडाडून विरोध करणारे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांनी लोकवर्गणी व स्वतः रुग्णसेवेच्या पैशातून निर्माण केलेल्या भव्य शारदामाता गर्ल्स होस्टेलच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या इमारतीचे लोकार्पण अपेक्षित आहे. या इमारतीसाठी साडेचार कोटी रुपये खर्च आला असून, अत्यल्पदरात गोरगरिबांच्या मुली या होस्टेलमध्ये राहून आपले शिक्षणाचे स्वप्न साकार करू  शकणार आहेत.
खेड्यापाड्यांतील मुलींना शिक्षणाची सोय नसल्याने या मुली दहावी-बारावीनंतर उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांना उच्चशिक्षणासाठी शहरी भागात जावे लागते व शहरात त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही पालकांना सतावत होता. त्यामुळे खेड्यापाड्यांतील पालकांनी आमच्या मुलींच्या शिक्षण व राहण्याची सोय विवेकानंद आश्रमात करा, अशी विनंती प.पू. शुकदास महाराजांना केली होती. पालकांच्या आग्रहास्ताव महाराजश्रींनी आपले हजारो कार्यकर्ते लोकवर्गणीसाठी खेडोपाडी पाठवून शारदामाता गल्र्स होस्टेलचा प्रकल्प हाती घेतला होता. समाजात विलक्षण वाढलेले स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण पाहून कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज हे प्रचंड व्यथित झाले होते. त्यामुळे त्यांनी हिवरा आश्रम येथेच आध्यात्मिक व भयमुक्त वातावरणात गोरगरिबांच्या मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी भव्य गर्ल्स होस्टेल उभारण्याचा निर्णय घेतला होता.

 गर्ल्स होस्टेलची अद्यावत इमारत
गर्ल्स होस्टेलची अद्ययावत इमारत असून  तब्बल चारमजली आहे.गर्ल्स होस्टेल हे ९६ खोल्याचे आहे. विशेष बाब म्हणजे, या इमारतीचे भूमीपूजनही महाराजश्रींनी मुलींच्याच हस्ते करवून घेतले होते. एकूण चार मजले असलेल्या या इमारतीत प्रत्येक मजल्यावर २४ खोल्या आहेत. तर एका खोलीत सहा मुली राहू शकतात. अशाप्रकारे ९६ खोल्यांमधून ५७६ मुलींच्या राहण्याची सोय या गल्र्स होस्टेलमध्ये झाली आहे. निवास व भोजन अशी सोय या इमारतीत आहे.


विवेकानंद आश्रमाच्या भयमुक्त वातावरणात आता या सावित्रीच्या लेकी शिकू शकतील, त्यांचे भवितव्य घडवू शकतील. या होस्टेलचे बांधकाम पूर्ण झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण नियोजित आहे. त्यासाठी विवेकानंद आश्रमातर्फे त्यांना निमंत्रणही पाठविण्यात आले आहे.
                                                                   संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम

रविवार, २३ डिसेंबर, २०१८

''फरिश्तो'' से बढकर है यहा ''इन्सान'' बनना !



आपल्या अबोल डोळयांनी,निरागस हास्याने व बोबडया बोलांनी कुणालाही तो लहानपणी सहज आपल करून टाकायचा... त्याच्या सहवासात एकदा कुणी आलं म्हणजे मग तो नकळतचं त्यांचा झाला म्हणून समजा ! प्रेमळ स्वभाव व संवेदनशील मन हा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा स्थायी भाव... लहानपणापासून नाविण्यपूर्ण गोष्टी करण्याची सवय त्याला जडली होती... खेळणी असो की बॅटरी असो ती एकदा खोलून त्यांच्या आत काय ? हे बघण्याचे कुतूहल व जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती...कदाचित हाच त्याचा स्वभाव त्याला वेळोवेळी यशाच्या अनेक वाटा मोकळया करून देण्यासाठी तितक्याच मोलाच्या ठरल्या... वडील बंधू विजय थोरहाते यांनी २००१ च्या दरम्यान नवीन कॉम्प्युटर विकत घेतला होतो. दादा,‘‘मला कॉम्प्युटर शिकण ना ! म्हणून हट्ट करणारा पवन आज सुध्दा डोळया समोर उभा राहतो... बाबा,‘मी एम.एस.आय.टी. पास झालो ! म्हणून त्याने दिलेला कुटूंबीयांचा आनंदाचा सुखद धक्का किती आनंद देवून गेला तो क्षण शब्दात मांडणे कठीणच ! घरातील प्रत्येकाला तो दिसला नाही की, काही क्षण हरविल्या सारख वाटत होते... अरे आज पवन कुठे आहे, अशी विचार आम्हा भावंडांना वडीलाधारी मंडळी करीत असे...प्राथमिक शाळेत नाव टाकल्या नंतर पवनची अभ्यासात गोडी लागली...आपण अभ्यास करून काही तरी यशप्राप्त करण्याची मनिषा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.. दहावी,बारावीच्या निकाला नंतर पवन पेढा घेवून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांकडे गेला तेंंव्हा,शाब्बास !! म्हणून त्यांच्या पाठीवर थाप दिली. पवन, खूप शिक्षण घे ! मोठा हो !! असा आशिर्वाद दिला.
पवन,‘‘ तू बाहेर शिकायला जाण्यापेक्षा आपल्या येथेच कृषी महाविद्यालयात प्रवेश घे! असा सल्ला आत्मानंद भाऊंनी दिला. कुटूंबीयांना आत्मानंद भाऊचा सल्ला पटला व सर्वांचे एकमत झाले. विवेकानंद कृषी महाविद्यालयातील कृषीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जालंधर शिक्षण घेतांना आत्मानंद भाऊ व मला फोन करून दादा,अरे येथे मन लागत नाही रे! असे नेहमीच फोन करून सांगत होता.
मात्र पवन शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय घरी येवून नको नाही तर बघ ! आत्मानंद भाऊंनी दिलेला सल्ला त्याला पटला.
भीड़ में खड़ा होना मकसद नहीं है मेरा
बल्कि भीड़ जिसके लिए खड़ी है वह बनना है मुझे !
वरील कवीते प्रमाणे मनाशी खुणगाट बांधली..आता घरी परतायचे ते यशस्वी होवूच या मतावर तो ठाम झाला. नंतर तो घरी आला तो उत्तीर्ण होवूच... विवेकानंद कृषी महाविद्यालयात प्राध्यापक पदी रजू झाल्यावर कुटूंबीयांना व आम्हा भावंडांना खूप समाधान व आनंद झाला.
पवन आज तुझा वाढदिवस एक आनंदाचा क्षण..आयुष्यात पावलोपावली तुला यश,सुख व समृध्दी लाभत जावो ही कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज चरणी प्रार्थना...
तुझा बंधू
संतोष थोरहाते,
विवेकानंद नगर,हिवरा आश्रम


विद्यापीठ क्रिकेट संघाच्या कॅप्टन पदी राहुल म्हस्के ची निवड



कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी व्यवस्थापन व्यवस्थापन महाविद्यालयाच्या  तीस-या वर्षात शिकणारा विद्यार्थी राहूल म्हस्के यांची डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाच्या कॅप्टन म्हणून झाली आहे.  
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट सामन्याचे आयोजन दि. २० डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान सुरत येथे आयोजीत केले आहे.  डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट चमूमध्ये विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी राहूल म्हस्के यांची कॅप्टन म्हणून तर विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी ज्ञानेश्वर बानोरे,गोपालसिंग राजपूत यांची संघात निवड झाली आहे. सुरत येथे  संपन्न  होणा-या  पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट सामन्यांमध्ये महाराष्ट्र,राजस्थान,गुजरात सह २१ राज्यातून संघ क्रिकेट खेळण्यासाठी येणार आहेत. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रिकेटच्या संघ व्यवस्थापक म्हणून विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्रा.विशाल काकड यांची निवड झाली आहे. राहूल म्हस्के या विद्यार्थ्याने  या अगोदर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन धावण्याच्या स्पर्धेत २००,४०० ८०० मीटर सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त नारायण भारस्कर,पुरूषोत्तम आकोटकर,प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,अनुप शेवाळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

धावण्याच्या स्पर्धेत सिल्व्हर मेडल
राहूल म्हस्के या विद्यार्थ्याने  या अगोदर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन धावण्याच्या स्पर्धेत २००,४०० ८०० मीटर सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे.

विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांची डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाच्या  कॅप्टन व संघात मिळविलेले स्थान खरोखरच कौतुकास्पद व अभिनंदन करण्याजोगे आहे.

                                           संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

आधुनिक जीवनशैलीत आरोग्याची काळजी घ्या- आ.डॉ रायमूलकर



सद्याचे युग हे स्पर्धेचे धकाधकीचे आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे आहार विहारात खूप बदल झाले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम झाले असून त्यामुळे माणसाला अनेक आजार जडत आहे. आधुनिक जीवनशैलीत आरोग्य सांभाळा असे विचार .डॉ.संंजय रायमूलकर यांनी येथूनच जवळ असलेल्या प्रती पंढरपूर देऊळगांव माळी येथे आयोजीत मोफत आयुर्वेदीक रोग निदान शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना काढले.
संत जनार्धन स्वामी सदगुरू सेवाश्रम,ॠषीवेद हर्बल प्रॉडक्ट प्रा.लि. हरिव्दार,जे.एम.डी.मेडिको सव्र्हीसेस लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळगांव माळी येथे भव्य मोफत आयुर्वेदीक रोग निदान शिबीराचे उदघाटन प्रसंगी गुरूवार ता.२०  ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पुजन दिप प्रज्वलन करून करण्यात आली
  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं..सदस्य शिवप्रसाद मगर हे होते तर प्रमख पाहूणे म्हणून मेहकरचे ठाणेदार .एम प्रधान,अध्यक्ष बळीराम गिरी महाराज,विठ्ठल रूखमिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव मगर,बि.के.सुरूशे,ग्रा..सदस्य सचिन मगर,श्रीराम बळी,हभप नवले महाराज,प्रकाश महाराज,सखा पाटील,विश्वबंर भराड,डॉ.नरहरी मगर,डॉ.गजानन गि-हे,डॉ.सुजाता भराड,डॉ.कु.वर्षा बळी तथा आदींची उपस्थिती होती. या दोन दिवशीय भव्य मोफत आयुर्वेदीक शिबीराचा सुमारे ४०० ते ५०० गरजू रूग्णांनी लाभ घेतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार प्रदर्शन उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश मगर पाटील यांनी मानले.