Responsive Ads Here

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

विवेकानंद कृषीचे विद्यार्थी कृषी प्रयोगशाळेवर गिरवितात प्रात्यक्षिकाचे धडे !





शेतीचे ज्ञान हे वातानुकूलीत खोलीमध्ये राहून शिकता येत नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन राबावे लागते. त्यासाठी मातीचा स्पर्श अनुभवावा लागतो. यासाठी प.पू. शुकदास महाराजांनी विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या सुरूवातीपासून कटाक्षाने लक्ष दिले. विद्यार्थ्यांना  फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिक्षण दिले तर ते अधिक परिणाम कारक ठरते. याचा प्रत्यय येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद कृषी शाखेच्या महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थींनी विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर प्रायोगीक तत्वावर करीत आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनासाठी एक एकर क्षेत्रामध्ये सदर कृषी प्रयोगशाळा उभारली असून या कृषी प्रक्षेत्रावर विद्यार्थी प्रत्यक्ष अभुभवातून कृषीचे अद्यावत शिक्षण घेतांना दिसून येत आहे. कृषी शाखेच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये कृषीशी निगडित सर्व अन्नधान्ये पिके,फळे,भाजीपाला,फुलशेती यांची लागवड, खते, पाणी, कीड रोग, पिकांची काढणी, मळणी, आधुनिक तंत्रज्ञानाचे कृषी अवजारे, साठवणूक आणि विक्री या बाबीचा सखोल अभ्यास विद्याथ्र्यांना असतो. सध्याची कृषी शिक्षण पध्दती ही अत्यंत जलद असून  ती सहामाही सत्रात विभागल्या गेली आहे. यामुळे विद्यार्थी व प्राध्यापकांना अभ्यासक्रम वेळात आटोपता घ्यावा लागतो. पुस्तकात वाचून परिक्षेची तयारी करता येते मात्र प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय त्या विषयाचे परिपूर्णपणे आकलन होत नाही. याच बाबींचा विचार करून विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांच्या मार्गदर्शनात प्रा.समाधान जाधव,प्रा.पवन थोरहाते यांनी महाविद्यालयातील प्रक्षेत्रावर रब्बीशी निगडीत सर्व पिकांची पेरणी विद्यार्थ्यांनाकडून करून घेतली. 


शास्त्रशुध्द पध्दतीने प्रक्षेत्राचे नियोजन

कृषी शाखेत प्रवेश घेतल्यापासून ते अंतिम वर्षापर्यंत विद्यार्थी विद्यार्थींनींना प्रत्येक पातळीवर शेतीचे शास्त्रशुध्द पध्दतीने अनुभवातून ज्ञान दिले जाते. या विद्यार्थ्यांना रब्बी हंगामात हरभरा,सुर्यफूल,करडी,जवस,वाटाना,बटाटे,हे पिके लागवडीकरीता देण्यात आलेले आहे. सदर विद्यार्थी पीक लागवडीपासूत ते  काढणीपर्यंत या पिकांची लागवड,पाणी व्यवस्थापन,खत व्यवस्थापन,रोड नियंत्रण,किड नियंत्रण,पिकांची काढणी,मळणी या सर्व बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करतात. 

विवेकानंद कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात शेतीचे अद्यावत शिक्षण देण्याचा मानस आहे.
 प्रा.समाधान जाधव,विभाग प्रमुख कृषीविद्या विवेकानंद कृषी महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा