Responsive Ads Here

सोमवार, ३ डिसेंबर, २०१८

कर्मयोगी प.पू. शुकदास महाराज हिरक महोत्सव जयंतीचे आयोजन




विवेकानंद आश्रमाचे संस्थापक लाखो दीन दुःखीतांना आरोग्य प्रदान करणारे कुशल धन्वंतरी आपले संपूर्ण जीवन मानवसेवेसाठी अर्पण केलेले कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या हिरक महोत्सव जयंती सोहळयाचे आयोजन कार्तिकवद्य त्रयोदशी बुधवार ता. ५ डिसेंबर रोजी विवेकानंद आश्रमात करण्यात आले आहे. त्यानिमित्त विवेकानंद आश्रमात विविध धार्मिक,सामाजिक व शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५ ते ६ मंगलधून व मंत्रघोष ,सकाळी ६ ते ७ ग्राम सफाई,दिंडी परिक्रमा,सकाळी ७.१५ ते ८.३० सामुदायिक प्रार्थना,अनुभूति,हभप विष्णु थुट्टे शास्त्री यांचे प्रवचन, सकाळी ८.३० पासून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या समाधि दर्शन व पूजन सोहळा, विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय वक्र्तृत्व स्पर्धेला सुरूवात होणार असून यावर्षी महात्मा गांधी विचार काळाची गरज या विषयावर वक्ते आपले कौशल्य पणाला लावतील. या स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम,सन्मानपत्र व चषक या स्वरूपाचे बक्षिसे दिले जातील. दिवसभर आश्रमाच्या विविध शैक्षणिक संस्थानी आयोजीत विज्ञान प्रदर्शनी, क्रीडास्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्तकला प्रदर्शनी तसेच जिल्हा परिषद प्राथमीक शाळेच्या स्पर्धा होणार आहेत. सकाळी ११ वाजता विवेकानंद ज्ञानपीठ येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराला सुरूवात होईल. या शिबीराचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.निरूपमा डांगे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ६ ते ७ विवेकानंद आश्रमाचा गायक वृंदांचा भक्तीगीत गायन कार्यक्रम,रात्री ७ ते ७.३० सामूदायीक प्रार्थना,हभप निवृत्तीनाथ शास्त्री येवले महाराज यांचे प्रवचन,रात्री ७.३० ते ९ कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजश्रींच्या प्रतिमेचे पूजन, उद्योजक शैलेश बाहेती यांचेकडून निराधार वृध्दांना कपडे वाटप,बक्षिस वितरण समारंभ व रात्री ९ ते १० विवेकानंद जयंती महोत्सवासाठीच्या उत्सव समितीची सभा संपन्न होईल. कार्यक्रमासाठी राज्याभरातून हजारो भाविक आश्रमात दाखल होतील. त्यासाठीची तयारी पूर्ण झाल्याचे आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगीतले.


भव्य रोगनिदान शिबीर
प.पू.शुकदास महाराजश्रींच्या जयंती निमित्त भव्य रोगनिदान शिबराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबीरातील गरजूंना उपलब्धते नुसार मोफत औषधी व चष्म्याचे वितरण करण्यात येईल. सोबतच हाडातील कॅल्शियम, युरीक अॅसीड, हिमोग्लोबीन, रक्तातील शुगर इत्यादी तपासणी केल्या जातील.
प.पू. शुकदास महाराज हिरक महोत्सव जयंतीचे आयोजन
भव्य नेत्रतपासणी शिबीर आयोजन, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी

 जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी
विवेकानंद आश्रमाच्या व्यासपीठावर सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय वक्र्तृत्व स्पर्धेला सुरूवात होणार असून यावर्षी महात्मा गांधी विचार काळाची गरज या विषयावर वक्ते आपले कौशल्य पणाला लावतील. या स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम,सन्मानपत्र व चषक या स्वरूपाचे बक्षिसे दिले जातील.

संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा