Responsive Ads Here

बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

रासेयो सामाजिक कार्याचा स्त्रोत - संतोष गोरे




रासेयो शिबीरातून  विद्यार्थ्यांच्या मनावर श्रमसंस्काराचे बीज रूजतात. सामाजिक एकोप्याच्या भावनेचा विकास होतो. एकजूटीने एकोप्याच्या भावनेतून व्यक्ती मोठे काम सहज करू  शकतो हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये  निर्माण होतो. रासेयो शिबीराच्या माध्यमातून समाजसेवेची भावना वृध्दींगत होते. रासेयो सामाजिक कार्याचा स्त्रोत असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या श्रमसंस्कार शिबीरात  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना  शनिवारी ता. रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अणाजी सिरसाट तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर, उपप्राचार्य प्रा.कैलास भिसडे, प्रा.गणेश चिंचोले तथा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना संतोष गोरे म्हणाले कीविद्यार्थ्यांच्या मनावर श्रमसंस्कार,राष्ट्रप्रेम,ग्रामस्वच्छता सोबतच समाजप्रबोधनाची भावना वृध्दींगत होते.रासेयो शिबीरात शिबीरार्थी विद्यार्थी विद्यार्थीनींना समाजसेवेची आवड निर्माण होते असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्ञानेश्वर गाडे यांनी तर सूत्रसंचालन कु.पुनम अवचार,कु.अन्नपूर्णा थोरहाते यांनी तर आभार प्रदर्शन राहूल वरूडकर यांने मानले.

तरूणांनी सामाजिक कार्यात आनंद शोधावा
तरूण हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. तरूणांच्या मनगटातील ताकदीनेच अनेक सामाजिक कार्याला गती मिळते. तरूणांनी सोशल मिडीयात अधिक वेळ घालवता सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. तरुणांनी सामाजिक कार्यातून आनंद शोधावा असे विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मांनद थोरहाते यांनी रासेयोच्या शिबीरातील विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले.

संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा