Responsive Ads Here

गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

मत्सासन

सर्वांगासन

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

ध्येयाचा पाठलाग करतांना संयम बाळगा ! - संतोष गोरे

शिक्षण हा एक आनंददायी सुखकारक प्रवास आहे. विद्यार्थ्यांनो केवळ स्वप्न पाहू नका,स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करा. जिद्द,चिकाटी,परिश्रमासोबत आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ रहा. शिक्षणासोबत आपल्या आचार-विचारातून समाजासमोर आदर्श उभा करा. विद्यार्थ्यांनो ध्येयाचा पाठलाग करतांना संयम बाळगा असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
येथील विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित प्रथम पदवीदान सोहळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी  गुरूवारी ता.२० रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दिप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.डी.पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा येथील जे. बी. विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. एस. एस. झाडे तर डॉ. पी. एन. मूलकलवार,डॉ. . व्ही. देशमुख, डॉ. यु. एस. थूल, डॉ. सी. एस. खोदरे, विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत तथा आदि उपस्थित होते.
 कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातून तीन वर्षाचा विज्ञान स्नातकाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल या महाविद्यालयातील पदवीधारकांचा पदवीदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळयामध्ये विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातून ३५ पदवीधारक विद्यार्थी विद्यार्थीनींना पदवी प्रमाणपत्राने सन्मानीत करण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थी,विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोहळयाचे संयोजक प्रा. जयप्रकाश सोळंकी यांनी तर सूत्रसंचालन हे प्रा. कु. मनीषा कुडके तर आभार प्रदर्शन प्रा.कु.समता कस्तुरे यांनी केले. या पदवीदान सोहळाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मनोज मु-हेकर, प्रा.अमोल शेळके,प्रा.सौरभ आंबेकर,प्रा. कु. मधुरा सातपुते, प्रा. योगेश काळे, प्रा. किशोर गवई, प्रा. गजानन गायकवाड, डॉ. रामेश्वर धमक, डॉ. गौतम जयगावकर प्रा.अरुण फाजगे शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी तथा आदींनी यांनी परिश्रम घेतले

संतोष थोरहाते
पत्रकारदैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

आरोग्याच्या अनभिनतेमुळे समाज अंधश्रध्देला बळी- प्राचार्य के.डी.पाटील

आजच्या प्रगत भारतात ब-याच आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. समाजाने आरोग्याच्या बाबत जागरूक होणे आवश्यक आहे. आरोग्य बाबतच्या माहितीच्या अभावामुळे अनेक आजारात वाढ होते. अनुवांशिकतेवर माहिती देण्यासाठी व प्राथमिक स्थळावर काळजी घेणे व जागृती निर्माण करण्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करणे काळाची गरज आहे. आरोग्याच्या अनभिनतेमुळे समाज अंधश्रध्देला बळी पडत  असल्याचे विचार विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.डी.पाटील यांनी केले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित अनुवांशिक अभियांत्रिकी विषयावर प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कु. समता कस्तुरेप्रा.कु.मधुरा सातपुते यांच्या एक दिवशीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन प्रसंगी बुधवारी ता.५ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य  के.डी.पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ येथील प्रा.जी.के.मुंढे उपस्थित होते.
उदघाटन समारंभा नंतर तांत्रिक सत्रामध्ये अनुवांशिक अभियांत्रिकी यावर बीएससी च्या विद्याथी विद्यार्थीनींना प्रा.जी.के.मुंढे यांनी माहिती व प्रात्यक्षिक केले.या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.यावेळी प्रा.डॉ.राम धमकप्रा.डॉ.गौतम जयगावकर,प्रा.गजानन गायकवाडप्रा.किशोर गवईप्रा.योगेश काळेप्रा.सौरभ आंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कु.मनिषा कुडके यांनी तर सूत्रसंचालन प्रा. कु.समता कस्तुरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कु.मधुरा सातपुते यांनी मानले.

आरोग्याच्या अनभिनतेमुळे समाज अंधश्रध्देला बळी- प्राचार्य के.डी.पाटील

आजच्या प्रगत भारतात ब-याच आजारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. समाजाने आरोग्याच्या बाबत जागरूक होणे आवश्यक आहे. आरोग्य बाबतच्या माहितीच्या अभावामुळे अनेक आजारात वाढ होते. अनुवांशिकतेवर माहिती देण्यासाठी व प्राथमिक स्थळावर काळजी घेणे व जागृती निर्माण करण्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करणे काळाची गरज आहे. आरोग्याच्या अनभिनतेमुळे समाज अंधश्रध्देला बळी पडत  असल्याचे विचार विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.डी.पाटील यांनी केले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित अनुवांशिक अभियांत्रिकी विषयावर प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कु. समता कस्तुरे, प्रा.कु.मधुरा सातपुते यांच्या एक दिवशीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन प्रसंगी बुधवारी ता.५ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य  के.डी.पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ येथील प्रा.जी.के.मुंढे उपस्थित होते.
उदघाटन समारंभा नंतर तांत्रिक सत्रामध्ये अनुवांशिक अभियांत्रिकी यावर बीएससी च्या विद्याथी विद्यार्थीनींना प्रा.जी.के.मुंढे यांनी माहिती व प्रात्यक्षिक केले.या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.यावेळी प्रा.डॉ.राम धमक, प्रा.डॉ.गौतम जयगावकर,प्रा.गजानन गायकवाड, प्रा.किशोर गवई, प्रा.योगेश काळे, प्रा.सौरभ आंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कु.मनिषा कुडके यांनी तर सूत्रसंचालन प्रा. कु.समता कस्तुरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कु.मधुरा सातपुते यांनी मानले.

विवेकानंद आश्रमाच्या निस्वार्थ सेवाभाव वृत्तीत समाजहित- जि.प.अध्यक्षा सौ.पवार

स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवेच्या महामंत्राला कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी  रुग्णसेवा व मानवसेवेच्या उपक्रमातून मूर्तरूप दिले. मानवाच्या कल्याणासाठी विवेकानंद आश्रमाचे सेवाकार्य असून येणा-या भावी पिढीसाठी हे सेवाकार्य दिपस्तंभा प्रमाणे कार्य करत राहील. विवेकानंद आश्रमाच्या  निस्वार्थ सेवाभाव वृत्तीत समाजहित समावले असल्याचे भावोदगार बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मनिषाताई पवार यांनी सदिच्छा भेट प्रसंगी बोलतांना काढले. विवेकानंद आश्रमाच्या प्रवेशव्दारावर सकाळी ११ वाजता त्यांचे विवेकानंद आश्रमाच्या पदाधिका-यांनी स्वागत केले. यावेळी  विवेकानंद आश्रमाव्दारे सुरू असलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांना त्यांनी भेटी देवून समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मनिषाताई पवार यांचे आश्रमाच्या वतीने विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व महाराजश्रींचे ग्रंथ भेट देवून त्यांचे यथोचित स्वागत केले. यावेळी नितीन पवार, आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त नारायण भारस्कर, प्राचार्य पंढरीनाथ शेळके, पत्रकार समाधान म्हस्के पाटील तथा आदि उपस्थित होते.

सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

कृषीचे विद्यार्थी म्हणजे यश हमखास- ठाणेदार संग्राम पाटील

जीवनात यश मिळविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. यशस्वी होण्यासाठी ज्ञान,साधना कष्ट करावे लागतात. शेती विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील कष्टकरी समाजाचे अवलोकन करतात. त्यांचा संबंध शेती मातीशी येतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी झटण्याची त्याला प्रेरणा मिळते तसेच शेती विषयाच्या पदवीपर्यंतच्या अभ्यासात अनेक विषयांचे ज्ञान सामावलेले आहे त्यामुळे कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमधून हमखास यशस्वी होतात असे विचार साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी केले.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा शिबीराच्या उदघाटन प्रसंगी लव्हाळा येथे सोमवारी ता.१० रोजी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होतेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे होते. प्रमुख पाहूणे म्हणून लव्हाळा ग्रामपंचायतचे सरपंच दिनकर कंकाळ,पोलीस पाटील इंगळे,प्रगतशील शेतकरी विलास लहाने तसेच विवेकानंद आश्रमाचे अशोक थोरहाते,संतोष गोरे,आत्मानंद थोरहाते व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज,डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन दिप प्रज्वलन करून झाली. पुढे बोलतांना ठाणेदार पाटील म्हणाले की, प्रयत्न सतत प्रयत्न हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे त्यासाठी विद्याथ्र्यांनी अपयशाने डगमगता प्रयत्नशील राहायला हवे. आज राज्यात प्रशासकीय व्यवस्थेत कृषी विषयाचे विद्यार्थी अधिकारी पदावर आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जान्हवी डोसे,अभिजीत चव्हाण यांनी  तर प्रास्ताविक कु.वर्षा कापूरे हिने केलेशेळके याने आभार प्रदर्शन करून झाला. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.चैतन्य देशमुख, प्रा.प्रतिक उगले, प्रा.आकाश इरतकर, प्रा.मिनाक्षी कडू, प्रा.राहूल साळवे, प्रा.दळवी, जीवन केंदळे, पत्रकार संतोष थोरहाते, दिलीप मिसाळ, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी कर्तृत्व सिद्ध करावे - सहसचिव आत्मानंद थोरहाते
स्वामी विवेकानंद अभिप्रेत असलेला तरुण हा ऊत्साही,विवेकी चारित्र्यसंपन्न होय. महापुरुषांच्या जीवनाचा आदर्श समोर ठेऊन जीवन जगा. जीवनात यश हवे असेल तर जिद्द,चिकाटी आत्मविश्वास ठेवा. विद्यार्थ्यांनी कर्तृत्व सिद्ध करावे असे यावेळी बोलतांना सांगितले. 


कथक नृत्याने मंत्रमुग्ध
यावेळी कृषि महाविद्यालयाच्या कु.नुतन घुगे, कु.कोमल बोरकर या विद्यार्थिनींनी  गणेशवंदना वर कथक नृत्य सादर केले. त्यांनी सादर केलेल्या गणेश वंदना नृत्याने उपस्थित श्रोत्यांना  मंत्रमुग्ध केले.


संतोष थोरहाते
पत्रकारदैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा


मो.९९२३२०९६५८