Responsive Ads Here

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

ध्येयाचा पाठलाग करतांना संयम बाळगा ! - संतोष गोरे

शिक्षण हा एक आनंददायी सुखकारक प्रवास आहे. विद्यार्थ्यांनो केवळ स्वप्न पाहू नका,स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करा. जिद्द,चिकाटी,परिश्रमासोबत आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ रहा. शिक्षणासोबत आपल्या आचार-विचारातून समाजासमोर आदर्श उभा करा. विद्यार्थ्यांनो ध्येयाचा पाठलाग करतांना संयम बाळगा असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
येथील विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित प्रथम पदवीदान सोहळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी  गुरूवारी ता.२० रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दिप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.डी.पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा येथील जे. बी. विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. एस. एस. झाडे तर डॉ. पी. एन. मूलकलवार,डॉ. . व्ही. देशमुख, डॉ. यु. एस. थूल, डॉ. सी. एस. खोदरे, विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत तथा आदि उपस्थित होते.
 कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातून तीन वर्षाचा विज्ञान स्नातकाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल या महाविद्यालयातील पदवीधारकांचा पदवीदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळयामध्ये विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातून ३५ पदवीधारक विद्यार्थी विद्यार्थीनींना पदवी प्रमाणपत्राने सन्मानीत करण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थी,विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोहळयाचे संयोजक प्रा. जयप्रकाश सोळंकी यांनी तर सूत्रसंचालन हे प्रा. कु. मनीषा कुडके तर आभार प्रदर्शन प्रा.कु.समता कस्तुरे यांनी केले. या पदवीदान सोहळाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मनोज मु-हेकर, प्रा.अमोल शेळके,प्रा.सौरभ आंबेकर,प्रा. कु. मधुरा सातपुते, प्रा. योगेश काळे, प्रा. किशोर गवई, प्रा. गजानन गायकवाड, डॉ. रामेश्वर धमक, डॉ. गौतम जयगावकर प्रा.अरुण फाजगे शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी तथा आदींनी यांनी परिश्रम घेतले

संतोष थोरहाते
पत्रकारदैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा