येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिराची विद्यार्थीनी कु.किमया कमलेश बुधवाणी हिचा इको फ्रेन्डली पेस्ट कंट्रोलर विज्ञान प्रकल्पाची जिल्हास्तरावर प्रथम येवून राज्यस्तरावर निवड झाली. आळी,किटकांमुळे दरवर्षी शेती मालाचे ३० ते ४० टक्के नुकसान होवून उत्पादन वाढीवर परिणाम होतो. किटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी मोठ्या रासायनिक किटनाशकांचा फवारणी करतो. त्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते. रासायनिक किटकनाशकांच्या फवारणीमुळे प्रदुषणा सोबत मानवी आरोग्यावर दुष्परीणाम दिसून येतात. वाशिम जिल्हयातील कारंजा येथे दि. ३० जानेवारी ते १ फेबु्रवारी पर्यत ब्ल्यु चिप कॉन्व्हेंट व हायस्कुल कारंजा येथे संपन्न झालेल्या इन्स्पायर अवॉर्ड अंतर्गत अवॉर्डी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय प्रदर्शनीमध्ये कु.किमया कमलेश बुधवाणी हिच्या इको फ्रेन्डली पेस्ट कंट्रोलर चा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक येवून तिची राज्यस्तरावर निवड झाली. या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनीमध्ये बुलडाणा जिल्हयातून ४४ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी ३ विद्यार्थ्यांचा राज्यस्तरासाठी निवड झाली. कु.किमया कमलेश बुधवाणी हि विवेकानंद विद्या मंदिराची इयत्ता ७ वीची विद्यार्थीनी आहे. किमयाला वडील कमेश बुधवाणी व आई मधुमती बुधवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हा प्रोजेक्ट बनविला होता. कु.किमया बुधवाणीच्या विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते, प्राचार्य कैलास भिसडे, उपप्राचार्य आत्मानंद थोरहाते, पर्यवेक्षक देवेंद्र मोरे, रमेश पवार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बाल वैज्ञानिकाचे सर्वस्तरावर कौतुक
कु.किमया कमलेश बुधवाणी हि विवेकानंद विद्या मंदिराची इयत्ता ७ वीची विद्यार्थीनी आहे. किमयाला वडील कमेश बुधवाणी व आई मधुमती बुधवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हा प्रोजेक्ट बनविला होता. कु.किमया बुधवाणीच्या विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल सर्वस्तरावर कौतुक होत आहे.
काय आहे इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर
शेतकरी बांधवांना अत्यंत कमी खर्चामध्ये इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर बनविता येते. यासाठी लाकडी फ्रेम,चाके,वेगळया आकाराची लोखंडी जाळी,मच्छरदाणी,बॅटरीसेल चार्चिंगसाठी चार्चर,एसी वायर इत्यादीची आवश्यकता असते. इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर किटकांपासून पिकांचे संरक्षण करता येते.
इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलर मुळे शेतकरी बांधवांच्या फवारणीच्या खर्चात बचत होते. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जावून प्रदुषणाला आळा बसतो. इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोलरचा विविध पिकांवरील कीटकांपासून बचावासाठी उपयोग करता येतो.
कु. किमया कमलेश बुधवाणी हिवरा आश्रम
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा