जीवनात यश मिळविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. यशस्वी होण्यासाठी ज्ञान,साधना व कष्ट करावे लागतात. शेती विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील कष्टकरी समाजाचे अवलोकन करतात. त्यांचा संबंध शेती व मातीशी येतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या उत्कर्षासाठी झटण्याची त्याला प्रेरणा मिळते तसेच शेती विषयाच्या पदवीपर्यंतच्या अभ्यासात अनेक विषयांचे ज्ञान सामावलेले आहे त्यामुळे कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमधून हमखास यशस्वी होतात असे विचार साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी केले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा शिबीराच्या उदघाटन प्रसंगी लव्हाळा येथे सोमवारी ता.१० रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे होते. प्रमुख पाहूणे म्हणून लव्हाळा ग्रामपंचायतचे सरपंच दिनकर कंकाळ,पोलीस पाटील इंगळे,प्रगतशील शेतकरी विलास लहाने तसेच विवेकानंद आश्रमाचे अशोक थोरहाते,संतोष गोरे,आत्मानंद थोरहाते व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज,डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन व दिप प्रज्वलन करून झाली. पुढे बोलतांना ठाणेदार पाटील म्हणाले की, प्रयत्न व सतत प्रयत्न हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे त्यासाठी विद्याथ्र्यांनी अपयशाने न डगमगता प्रयत्नशील राहायला हवे. आज राज्यात प्रशासकीय व्यवस्थेत कृषी विषयाचे विद्यार्थी अधिकारी पदावर आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जान्हवी डोसे,अभिजीत चव्हाण यांनी तर प्रास्ताविक कु.वर्षा कापूरे हिने केले. शेळके याने आभार प्रदर्शन करून झाला. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.चैतन्य देशमुख, प्रा.प्रतिक उगले, प्रा.आकाश इरतकर, प्रा.मिनाक्षी कडू, प्रा.राहूल साळवे, प्रा.दळवी, जीवन केंदळे, पत्रकार संतोष थोरहाते, दिलीप मिसाळ, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कर्तृत्व सिद्ध करावे - सहसचिव आत्मानंद थोरहाते
स्वामी विवेकानंद अभिप्रेत असलेला तरुण हा ऊत्साही,विवेकी व चारित्र्यसंपन्न होय. महापुरुषांच्या जीवनाचा आदर्श समोर ठेऊन जीवन जगा. जीवनात यश हवे असेल तर जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास ठेवा. विद्यार्थ्यांनी कर्तृत्व सिद्ध करावे असे यावेळी बोलतांना सांगितले.
कथक नृत्याने मंत्रमुग्ध
यावेळी कृषि महाविद्यालयाच्या कु.नुतन घुगे, कु.कोमल बोरकर या विद्यार्थिनींनी गणेशवंदना वर कथक नृत्य सादर केले. त्यांनी सादर केलेल्या गणेश वंदना नृत्याने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
संतोष थोरहाते
मो.९९२३२०९६५८
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा