Responsive Ads Here

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

विवेकानंद आश्रमाच्या निस्वार्थ सेवाभाव वृत्तीत समाजहित- जि.प.अध्यक्षा सौ.पवार

स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवेच्या महामंत्राला कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी  रुग्णसेवा व मानवसेवेच्या उपक्रमातून मूर्तरूप दिले. मानवाच्या कल्याणासाठी विवेकानंद आश्रमाचे सेवाकार्य असून येणा-या भावी पिढीसाठी हे सेवाकार्य दिपस्तंभा प्रमाणे कार्य करत राहील. विवेकानंद आश्रमाच्या  निस्वार्थ सेवाभाव वृत्तीत समाजहित समावले असल्याचे भावोदगार बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मनिषाताई पवार यांनी सदिच्छा भेट प्रसंगी बोलतांना काढले. विवेकानंद आश्रमाच्या प्रवेशव्दारावर सकाळी ११ वाजता त्यांचे विवेकानंद आश्रमाच्या पदाधिका-यांनी स्वागत केले. यावेळी  विवेकानंद आश्रमाव्दारे सुरू असलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांना त्यांनी भेटी देवून समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मनिषाताई पवार यांचे आश्रमाच्या वतीने विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व महाराजश्रींचे ग्रंथ भेट देवून त्यांचे यथोचित स्वागत केले. यावेळी नितीन पवार, आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्वस्त नारायण भारस्कर, प्राचार्य पंढरीनाथ शेळके, पत्रकार समाधान म्हस्के पाटील तथा आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा