ध्येयाचा पाठलाग करतांना संयम बाळगा ! - संतोष गोरे
शिक्षण हा एक आनंददायी व सुखकारक प्रवास आहे . विद्यार्थ्यांनो केवळ स्वप्न पाहू नका , स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करा . जिद्द , चिकाटी , परिश्रमासोबत आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ रहा . शिक्षणासोबत आपल्या आचार - विचारातून समाजासमोर आदर्श उभा करा . विद्यार्थ्यांनो ध्येयाचा पाठलाग करतांना संयम बाळगा असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले . येथील विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित प्रथम पदवीदान सोहळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी गुरूवारी ता . २० रोजी ते बोलत होते . कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत व स्वामी विवेकानंद , कर्मयोगी संत प . पू . शुकदास महाराज , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून झाली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के . डी . पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा येथील जे . बी . विज्ञान महाविद्यालयाच...