Responsive Ads Here

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

विवेकानंद विद्या मंदिरचे विद्यार्थी मैदानी स्पर्धेत जिल्हास्तरावर


येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मैदानी स्पर्धेत  बाजी मारून या विद्यार्थ्यांची  जिल्हास्तरावर निवड झाली. मेहकर येथील क्रीडा संकुलावर ता.२४ रोजी पार पडलेल्या शालेय मैदानी स्पर्धेत प्रथम,व्दितीय तृतीय क्रमांक पटकाविला असून या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये १५०० मीटर धावणे स्पर्धेत कैलास काकड व्दितीय तर,उंच उडी मध्ये शुभम वडतकर प्रथम,२०० मीटर धावणे अमोल पेटकर प्रथम, ८०० मीटर धावणे गजानन जाधव व्दितीय,१०० मीटर धावणे मंगेश राठोड  व्दितीय,३०० मीटर धावणे राजेश चेके प्रथम, तर ३०० मीटर धावणे मयुर डुकरे व्दितीय, ४०० मीटर धावणे शिवाजी मुळे तृतीय, तर १४ वर्ष वयोगटा आतील मुले/ मुली मधून नचिकेत सावळे गोळा फेक प्रथम,प्रविण जोडणर गोळा फेक  तृतीय, शिवाजी पाटील लांब उडी व्दितीय, x १०० रिले संघ प्रथम यामध्ये रोहित ढवळे,शिवाजी पाटील,हरिओम भालेराव,नचिकेत साळवे,कु.महालक्ष्मी चिखलकर ४०० मीटर धावणे व्दितीय
सदर विजयी विद्यार्थ्यांची तयारी क्रीडा शिक्षक रणजित जाधव,आत्मानंद थोरहाते,गोविंद अवचार,श्याम खरात यांनी करून घेतली. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक कैलास भिसडे,उपप्राचार्य अशोक गि-हे,पर्यवेक्षक देवेंद्र मोरे,आत्माराम मोरे यांनी खेळांडूचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

'विवेकानंद कृषी' च्या गोपालसिंग राजपूतला क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक




येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिक्षण घेणा-या गोपालसिंग रंगनाथसिंग राजपूत यांने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विभागावर व्दितीय क्रमांक संपादन करून रौप्य पटकावले.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे  ता.२३ सप्टेंबर रोजी आयोजीत आंतर महाविद्यालयीन विभागस्तरीय धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या आंतर महाविद्यालयीन विभागीय स्तरीय २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांने व्दितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक तर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करून कांस्यपदक प्राप्त केले. गोपालसिंग राजपूत या विद्यार्थ्यांने २५ सेकंदात २०० मीटरची शर्यत पूर्ण करून रौप्य पदक पटकावले. तर .०२ मिनीटात ४०० मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करून कांस्यपदक पटकावले. आपली सर्वश्रेष्ठ व्यक्तिगत कामगिरी नोंदवत अंतिम फेरी गाठली होती.
गोपालसिंग राजपूत या विद्यार्थ्यांची तयारी विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्रा.रवींद्र  काकड,जिमखाना प्रमुख प्रा.शिवशंकर काकडे,प्रा.गजानन ठाकरे  यांनी करून घेतले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहातेसचिव संतोष गोरेसहसचिव विष्णुपंत कुलवंतआत्मानंद थोरहातेविवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवेकृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


४०० मीटर स्पर्धेत कांस्यपदक
गोपालसिंग राजपूत या विद्यार्थ्याने ४०० मीटर धावण्याची स्पर्धा  १.०२ मिनीटात पूर्ण केली. ४०० मीटर धावण्याची स्पर्धेत या विद्यार्थ्याने कांस्यपदक पटकावले. विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी गोपालसिंग राजपूत हा अश्वमेध स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.

अश्वमेध स्पर्धेत ठरला पात्र 
विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी गोपालसिंग राजपूत या विद्यार्थ्यांची धावण्याच्या २०१९ अश्वमेध स्पर्धेसाठी निवड झाली आहे.लहानपणा पासून खेळाची आवड आवड असलेला गोपालसिंग या विद्यार्थ्यांने अनेक क्रीडा स्पर्धेत विजयी झाला आहे. मुंबई येथे २०१८ मध्ये पार पडलेल्या धावण्याच्या स्पर्धेत विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी गोपालसिंग राजपूत हा अश्वमेध स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.

विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी गोपालसिंग राजपूत या विद्यार्थ्यांने  २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विभागावर व्दितीय क्रमांक संपादन करून रौप्य पटकावले. तर  ४०० मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करून कांस्यपदक पटकावले. या विद्यार्थ्यांची अश्वमेध स्पर्धेसाठी सुद्धा प्राप्त ठरला आहे.
                                                                डॉ. सुभाष कालवे प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८