जेष्ठ नागरीकांना कायद्याचे संरक्षण- जिल्हा न्यायधीश सय्यद


जेष्ठ नागरीक ही देशाची संपत्ती आहे. त्यांचा अनुभव, जीवन विषयक दृष्टीकोन कुटूंबाच्या समाजाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरणारा असतो. परंतु काही मुले आपल्या आईवडीलांचा सांभाळ करतांना दिसत नाही. त्यामुळे -याच जेष्ठ नागरीकांना वृध्दाश्रमाची वाट धरावी लागत आहे. आई वडीलांचा सांभाळ करणा-या मुलांना आता कायदाचा धाक निर्माण झाला आहे. २००७ च्या कायदयानुसार मुलांना आई वडीलांचा सांभाळ करणे हे मुलाचे कर्तव्य आहे. जेष्ठ नागरीकांसाठी कायदयात अनेक तरतूदी केलेल्या आहेत. कायदा तुमच्या पाठीशी आहे. जेष्ठ नागरीकांनी या कायदयांचा आधार घेवून सन्मानाने जगावे असे उदगार जिल्हा विधी प्राधीकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायधीश वरीष्ठस्तर बुलडाणा साजिद सय्यद यांनी विवेकानंद आश्रमात वृध्दाश्रमाला भेटी प्रसंगी काढले. वृध्दांनाची व्यवस्था त्यांना दिल्या जाणा-या सोयी सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा वकील संघाचे श्रीकांत मारोडकर वैद्यकिय अधिकारी प्रमोद टाले हे उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मान्यवरांनी आश्रम परिसराला भेट देवून संस्थेव्दारा सुरू असलेल्या सेवा उपक्रमांची पाहणी केली. कार्यक्रमाची सुरूवात अभय मासोदकर सज्जनसिंग राजपूत यांनी सादर केलेल्या गीतांनी झाली. निष्काम कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी दीन दुःखी,वंचितच्या सेवेसाठी विवेकानंद  आश्रमाची स्थापना केली असून त्यांचे संपूर्ण जीवन मानव सेवेसाठी समर्पित केले. आजही त्यांच्या प्रेरणेने निराधार वृध्दांची सेवा करण्याचे काम विवेकानंद आश्रम करीत असल्याचे आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रास्ताविकात सांगीतले. जिल्हा वकील संघाचे मारोडकर यांनी जेष्ठ नागरीकांचे हक्का बद्दल असलेल्या कायदयाची माहिती तर डॉ.प्रमोद टाले यांनी वृध्दांचे आजार त्यांनी घ्यावायचा आहार याबद्दल माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सुज्ञ नागरीक संघाचे शिवाजीराव घोंगडे,आश्रमाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.गजानन गि-हे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  ज्ञानेश्वर तिजारे, बेलाप्पा धाडकर, अधिक्षक मनोज डोंगर, विजय ठोकरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाला वृध्दाश्रमातील सर्व वृध्द  स्त्री पुरूष उपस्थित होते.

विवेकानंद आश्रमात वृध्दांशी साधला संवाद
दिवाणी न्यायधीश वरीष्ठस्तर बुलडाणा साजिद सय्यद यांनी विवेकानंद आश्रमात वृध्दाश्रमाला भेटी प्रसंगी काढले.वृध्दांनाची व्यवस्था त्यांना दिल्या जाणा-या सोयी सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी विवेकानंद आश्रमातील वृद्धांशी संवाद साधला.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा