Responsive Ads Here

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

विवेकानंद ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत जिल्हास्तरावर


कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाच्या विद्यार्थ्यांनी  दि. ११ सप्टेंबर रोजी मेहकर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी  स्पर्धेत विजयी होवून या विद्यार्थ्यांनीची जिल्हास्तरावर निवड झाली. मेहकर येथे क्रीडा संकुलावर पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये विवेकानंद ज्ञानपीठाच्या मुलींच्या  १७ वर्ष वयोगटामधून कु.वैष्णवी लोखंडे, कु.शिवानी कुरकुटे, कु.वर्षा करवते, कु.आरती हजारे, कु.पार्वती गायकवाड, कु.रूपाली डाखोरे, कु.रूख्मिणा चोंडकर, कु.निशा करवते, कु.स्वाती ठाकरे, कु.अंकिता भुरकाडे, कु.वैष्णवी सिडाम, कु.सपना झ्याटे या विद्यार्थीनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये विजयी होवून त्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. या खेळाडुची तयारी क्रीडा शिक्षक जयराम घोती,विजय गोरे  यांनी करून घेतली. या विजयी खेळाडूंचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, प्राचार्य  निवृत्ती शिंदे यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा