कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाच्या विद्यार्थ्यांनी दि. ४ व दि. ५ सप्टेंबर रोजी बुलडाणा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजयी होवून या विद्यार्थ्यांची विभागस्तरासाठी निवड झाली. बुलडाणा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये विवेकानंद ज्ञानपीठाच्या मुलांच्या १४ वर्ष वयोगटामधून सोनाजी रमेश डवरे तर १७ वर्ष वयोगटामधून प्रसाद केशव कुचके,नवनाथ वसुदेव टाले तर १९ वर्ष वयोगटामधून शिवम प्रमोद वानखेडे तर मुलीच्या १४ वर्ष वयोगटामधून कु.स्वाती प्रल्हाद बोरकर तर १७ वर्ष वर्ष वयोगटामधून कु.शिवानी सतिष कुरकुटे या विद्यार्थी व विद्यार्थीनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये विजयी होवून त्यांची विभागस्तरासाठी निवड झाली आहे. या खेळाडुची तयारी क्रीडा शिक्षक जयराम घोती,विजय गोरे यांनी करून घेतली. या विजयी खेळाडूंचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,
उपाध्यक्ष अशोक थोरहाते,
सचिव संतोष गोरे,
सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,
प्राचार्य निवृत्ती शिंदे यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक असून एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक,ग्राफिक्स डिझानर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. संतोष थोरहाते हे सध्या जनसंपर्क कार्यालय कार्यरत आहेत.
विवेकानंद ज्ञानपीठचे विद्यार्थी विभागस्तरावर
संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतोष थोरहाते एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक, ग्राफिक्स डिझायनर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तीमत्वावर दिसून येतो.संतोष थोरहाते हे दैनिक सकाळ मध्ये पत्रकार आहेत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा