पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना !

इमेज
 ० ब्रिक्स परिषदेसोबत संपूर्ण जगाची नजर पंतप्रधान मोदींवर ० परिषदेत आर्थिक सहकार, जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा  नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी BRICS परिषदेसाठी दोन दिवसांच्या २२-२३ ऑक्टोबर दौऱ्यासाठी रशियाच्या कझान शहराच्या दिशेने रवाना झाले आहेत. ब्रिक्स परिषदेसोबत संपूर्ण जगाची नजर पंतप्रधान मोदींवर असणार आहे. ते रशियामध्ये कोणत्या देशांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील यावर साऱ्यांच्या नजरा असणार आहेत. रशियात भारताचे राजदूत विनय कुमार यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी कझानमध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या समकक्षांसह द्विपक्षीय बैठक करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिषदेत आर्थिक सहकार, जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. काय आहे BRICS ब्रिक्स हा असा समूह आहे जो जगातील ४५ टक्के लोकसंख्या, जगातील ३३ टक्के जमीन आणि जगातील २८ टक्के अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतो. ब्रिक्सला BRIC या नावाने ओळखले जात होते. याची स्थापना २००६मध्ये सेंट पीटर्सबर्गमध्ये झाली. पहिल्या ब्रिक शिखर परिषदेचे आयोजन २००९ मध...

विधानसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्जांची स्विकृती

इमेज
  मुंबई :   निवडणूक मग कोणतीही असली तरी स्पर्धेतील उमेदवारांकडून अर्ज भरताना चांगल्या मुहूर्ताची वाट बघितली जाते. चांगला दिवस, त्या दिवसातील चांगली वेळ याचे गणित बघूनच अर्ज भरला जाण्याची परंपरा आहे.   महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असली, तरी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधण्यासाठी बहुतांश मतदारसंघांत २४ ऑक्टोबर रोजीच अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी आहे. यापैकी २७ ऑक्टोबरचा रविवार वगळता सहाही दिवस अर्ज भरता येणार आहेत. विशेष म्हणजे हे सहाही दिवस शुभ आहेत. अर्ज माघारीसाठी मात्र दिवाळीनंतरच पडद्यामागच्या हालचालींना वेग येणार आहे. २२ ते २९ ऑक्टोबर या काळात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. या सात दिवसांत एकच रविवार येतो, अन्य सर्व सहाही दिवस शासकीय सुटी नसल्याने यादिवशी अर्ज भरता येणार आहेत. त्यातही २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत आहे. हा दिवस शुभ मानला जातो, त्यामुळेच याच दिवशी अर्ज भरण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात गर्दी होण्याची शक्यता आहे. २४ ऑक्टोबरशिवाय २...

विदर्भातील जागावाटपावरून महायुतीमध्ये तिढा कायम !

इमेज
 * भाजपाची विदर्भात ५० हून अधिक जागा लढण्याची आग्रही भूमिका * विदर्भात अजित पवार,एकनाथ शिंदे १० ते १२ जागांवर मानवे लागणार समाधान  विधानसभा रणधुमाळी जोरात सुरू असून पक्षप्रमुख जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणूकीत विजय मिळविण्यासाठी प्रत्‍येक पक्षाने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरूवात होत आहे. पण दुसरीकडे  जागावाटपाचा तिढा मात्र सुटत नसल्याचे दिसून नाही. मविआ आणि महायुती यांचे विदर्भावरून रस्सीखेच असल्याचे समोर आले आहे. विदर्भातील जागावाटपावरून ठाकरे आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. पण आता महायुतीमध्येही विदर्भाच्या जागावाटपाचा तिढ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.  विदर्भात भाजपाने ५० जागा लढवण्याची तयारी  केली  आहे. त्‍यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्‍याग करावा लागणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपाने विदर्भात्‍ ५० हून अधिक जागा लढवण्याचा आग्रह धरला असून यामुळे महायुतीमध्ये तणावाचे वातावरण आहे.एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नरमाईची भूमिका घेवून त्‍याग करतील का ? अशा राजकीय चर्चेल...

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी' ची 16 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर !

इमेज
 *बारामती मतदारसंघात दिला 'हा' उमेदवार *विविध समाज घटकांतील लोकांना संधी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र विधानसभेसाठी 16 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केलीय. पाचव्या यादीत बारामती मतदारसंघातून मंगलदास तुकाराम निकाळजे यांना उमेदवारी दिलीय.राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल हे अखेर वाजलं आहे. विधानसभा निवडणुकांचं काउंटडाऊन आता सुरू झाला आहे.   केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आणि या घोषणेनुसारच येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत . त्यापुढे तीन दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हे जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष ॲक्शन मोडमध्ये आला आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून एकामागून एक सर्वच पक्ष त्यांच्या त्यांच्या पक्षांची यादी जाहीर करत आहेत. काल भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजप पक्षाकडून अधिकृतपणे पहिल्या यादीमध्ये ९९ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार ?

इमेज
 * बारामती विधानसभा निवडणूकीकडे राज्यासह देशाचे लक्ष लोकसभेच्या निवडणूकीमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष बारामती निकालाकडे लागले होते. आता विधानसभा निवडणूकीमध्ये मध्ये चित्र वेगळे नसल्याचे दिसून येत आहे. पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांच्या विरोधात चक्क त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार दंड थोपटण्याची शक्यता आहे.  असे झाल्यास बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळू शकते. बारामती शहरात अजित पवार यांच्या प्रचार यंत्रणेकडून त्यांच्या नावाच्या प्रचाराच्या वाहनांचा ताफा तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे.  या प्रचार रथावर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे आता  बारामतीतून राष्ट्रवादीचे  उमेदवार अजित पवार हेच असतील हे आता स्पष्ट झालंय.  यापूर्वी अजित पवारांनी तब्बल सहा वेळा बारामतीचं नेतृत्व केलंय आता सातव्यांदा अजित पवार  बारामतीच्या मैदानात उतरलेत. येत्या  28 तारखेला अजित पवार  उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आजपर्यंत अजित पवारांच्या विरोधात लढणा-याचं डिपॉझिट जप्त झालंय. मात्र, ...

सरकारी नोकरीची सुशिक्षतांना सुवर्णसंधी !

इमेज
 ० कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये रिक्त पदांसाठी भरती  ० अर्ज करण्याची २५ ऑक्टोबर अंतिम तारीख  मुंबई : सुशिक्षीत तरूणांसाठी  व नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता समोर आली आहे. या सरकारी नोकरी भरतीमुळे भरघोस पगाराची संधी सुशिक्षीतांना प्राप्त होणार आहे.  कर्मचारी राज्य विमा महामंडळाने रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची २५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी राज्य विमा महामंडळाने सीनियर रेजिडेंट, स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. काय आहे वयोमर्यादा कर्मचारी राज्य विमा महामंडळात सीनियर रेजिडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. तसेच स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६९ वय असावे. शैक्षणिक पात्रता नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/डीएनबी/ डिप्लोमा केला असावा. तर सुपर स्पेशलिस्ट पदासाठी नेफ्रोलॉजी आणि न्युरोलॉजी पदवी प्राप...

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी !

इमेज
० सणासुदीच्या काळात ८० हजारांचा आकडा पार मुंबई : दिवाळीचा सण काहि दिवसांवर येवून ठेपला असतांना सोन,चांदिच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अशातच सध्या सणासुदीचा काळ सुरु असून या कालावधीत अनेकजण सोनं- चांदी करतात. मात्र साततत्याने वाढत चाललेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. पाहा बाजारात काय आहेत आजचे दर.  आज सोन्याच्या दरात प्रति तोळा ४५० रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा दर ७८ हजार १७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तसेच चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे २ हजार ८०० रुपयांची वाढ झाली. दरम्यान, दिवाळी सण अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपला आहे. धनतेरस, भाऊबीज या सणांच्या मुहूर्तावरही लोक सोनं खरेदी करतात. त्यामुळे सोनं चांदीच्या दरात घट होणार की दराचा उच्चांक वाढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

देशातील १ लाख तरुणांना राजकारणात आणणार !

इमेज
०   वाराणसीमध्ये पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा ०  मोदींच्या हस्ते ६७०० कोटी रुपयांच्या २३ प्रकल्पांचे उद्घाटन वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. वाराणसीमध्ये बोलत असताना, देशातील एक लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचं वक्तव्य मोदींनी केलं आहे. तरुणांचे कुटुंबवादामुळे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठीच आम्ही राजकारणात अशा एक लाख तरुणांना आणण्याचा संकल्प केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. काल दि.२० ऑक्टोंबर २०२४ रोजी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली. देशामधील १ लाख तरुणांना राजकारणात आणणार असल्याचं ते म्हणाले. ज्या कटुंबामधील राजकारणाशी काहीही संबंध नाही त्या तरुणांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवलं जाईल असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. आज ६७०० कोटी रुपयांच्या २३ प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. पंतप्रधान मोदींचा तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा वाराणसी दौरा होता. आरजे शंकरा नेत्र रुग्णालयाचे या भेटीदरम्यान त्यांनी उद्घाटन केले. तसेच शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांची प्र...

उध्दव ठाकरेंनीच मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावे !

इमेज
 अमरावती येथे काँग्रेस युवक मेळाव्यात आ.यशोमती ठाकूर यांचे विधान  काहि दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांना आव्हान देत आहेत. मविआ आणि महायुती मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहिर करण्यास टाळाटाळ करत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उध्दव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानामुळे मविआच्या नेत्‍यांमध्ये खदखद सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र उध्दव ठाकरेंनीही मविआने जाहिर केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला माझा पाठिंबा असेल अस म्हणत वाद मिटवण्याचा प्रयत्‍न केला होता. त्‍यानंतर आता काँग्रेसच्या आ. यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केले आहे. उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत असे यशोमती ठाकूर यांनी म्हटल आहे. 

राहुरी तालुक्यात भाजपची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या माजी आमदार चंद्रशेखर कदम यांना पहिल्या यादीतून डावललं

इमेज
 अनेक मतदारसंघात भाजपातील निष्ठावान या यादीवर नाराज  भाजपने पहिली यादी जाहीर करत बाजी मारली खरी, मात्र आता अनेक मतदारसंघात भाजपातील निष्ठावान या यादीवर नाराज असल्याच समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात मागील वेळी पराभूत झालेल्या शिवाजी कर्डिले यांना पहिल्या यादी स्थान मिळालं. मात्र राहुरी तालुक्यात दोन वेळेस आमदार असलेले आणि भाजपची  तालुक्यात मुहूर्तमेढ रोवणारे माजी आमदार चंद्रशेखर कदम हे मात्र नाराज झाल्याचे समोर आल आहे. आपला मुलगा सत्यजित कदम याला उमेदवारीचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी त्याला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. यापूर्वी शिवाजी कर्डिले यांच्या उमेदवारीसाठी मी विद्यमान आमदार असतानाही थांबलो होतो. मात्र पक्षाने मला शब्द देऊन तो पूर्ण केला नाही, त्यामुळे भविष्यात मुलगा जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी बोलून दाखवला आहे.  दरम्यान, चंद्रशेखर कदम यांचे पुत्र सत्यजित कदम यांनी गेल्या दहा वर्षात देवळाली प्रवरा नगरपालिकेच नगराध्यक्ष पद भूषवतांना मतदारसंघात देखील आपला ठसा उ...

विवेकानंद आश्रमाच्या प्रगतीत सार्वजनिकहितांची वृध्दी- मुंबई हायकोर्ट न्यायमूर्ती जी.ए. सानप

इमेज
  हिवरा आश्रम: सार्वजनिक संस्था हया जनकल्याणासाठी झटणा-या असाव्यात. विवेकानंद आश्रमाचे समाजोपयोगी कार्य गेल्या अनेक वर्षापासून मी जाणून आहे. संस्थेच्या उद्दिष्टात सामान्य माणसाचे हित दडलेले असावे लागते. आरोग्य, शिक्षण, कृषी, पर्यावरण सुरक्षा, निसर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे. या गरजा पूर्ण करणे त्यातच सार्वजनिकहित आहे आश्रमाच्या भेटीत हे सर्वकार्य स्पष्टपणे दिसत आहे. आश्रमाच्या प्रगतीत सार्वजनिकहितांची वृध्दी होत आहे. असे उद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी आश्रमास आज दि. 20.10.2024 रोजी सदिच्छा भेटी प्रसंगी काढले.   आश्रमात आगमन प्रसंगी त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. संस्थेच्या दर्जेदार शिक्षण उपक्रमांमुळे लक्षावधी विद्याथ्र्यांना शिक्षण मिळाले असून त्यांच्या जीवनात समाधानकारक परिवर्तण झाल्याचे परिणाम दिसून येत आहेत. ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरक्षित व संस्कारक्षम वातावरण त्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी पुरक ठरत आहेत. त्यामुळे मुलींना मोठयाप्रमाणात फायदा मिळत आहे. आरोग्य सेवेचे महाराजांनी सुरु केलेले कार्य अव्याहतपणे सुरु असून पर्यावरण ...

नाशिक जिल्ह्यात चार आमदारांना भाजपाची पुन्हा उमेदवारी

इमेज
 सीमा हिरे, राहुल ढिकले, राहुल आहेर आणि दीपक बोरसे यांना उमेदवारी  नाशिक : भाजपाने नाशिक जिल्ह्यातील चार विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे, नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले, चांदवड मधून राहुल आहेर आणि बागलान मधून दीपक बोरसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे या यादीत प्रतीक्षेत आहेत, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सीमा हिरे आणि राहुल आहेर यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपा नेत्यांकडून विरोध करण्यात आला होता. विशेषतः राहुल आहेर यांचे बंधू केदा आहेर देखील चांदवड मधून उमेदवारीसाठी इच्छुक होते. केदा आहेर यांच्या समर्थनार्थ राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा केली होती. आता राहुल आहेर यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्याने केदा आहेर यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले जात आहे. नाशिक पश्चिम मधून देखील सीमा हिरे यांच्या उमेदवारीला विरोध झाल्यामुळे स्थानिक नेत्यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या स्थितीचा परिणाम काय होईल,...

लाडकी बहीण योजनेवरुन बँक कर्मचाऱ्यांचं संपाचं हत्यार !

इमेज
  महाराष्ट्र राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला आहे. यादरम्यान आता लाडकी बहीण योजनेवरुन बँक कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. महाराष्ट्रात बँक कर्मचाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी संपाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर ती राबवताना सुरक्षित वातावरण मिळत नसल्याचं बँक कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडून बँक कर्मचाऱ्यांचा झालेला छळ आणि हल्ला यामुळे हे संपाचं हत्यार उचलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. काय आहे बँकांचे  संपामागचे कारण ?  युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला आहे. UFBU ही नऊ बँक युनियनची संघटना आहे. UFBUचे राज्य समन्वयक देवीदास तुळजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लाडकी बहीण योजनेमुळे बँकांमध्ये मोठा गोंधळ माजला आहे. सरकारकडून नियोजनाचा तसंच संवाद साधण्याचाही अभाव आहे. या योजनेमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.'

काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच होणार जाहीर !

इमेज
* विदर्भातील ४ जागांवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद   मुंबई: विधानसभा निवडणुका आता अवघ्या महिनाभरावर आल्या आहेत. पण, अजूनही सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपला आघाडी घेत रविवारी आपल्या ९९ उमेदवारांच्या नावांसह पहिली यादी जाहीर केली. दुसरीकडे, महाविकास आघाडीही आपली पहिली यादी जाहीर करेल असं वाटत असताना मविआत नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. विदर्भातील ४ जागांवरुन शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद झाला असून उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यामुळे मविआच्या घटकपक्षांमध्ये एकच गोंधळ उडाला. शरद पवारांकडूनही मध्यस्थीचे प्रयत्न झाले. पण तेही निष्फळ ठरले. शिवसेना ठाकरे गटाने वेगळा निर्णय घेण्याचा विचार करु असं सांगितलं. या सर्व घडामोडींनंतर आता काँग्रेसने मात्र आपले उमेदवार निश्चित केले असून काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.  

विदर्भातील माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

इमेज
  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला,  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले , विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , विदर्भ काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार , मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे .  माळी समाजाचे विदर्भात जवळपास पंचवीस लाख मतदान आहे . माळी समाजाला सत्ताकारणात सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्षित ठेवले.  एक छगन भुजबळ वगळता एकही नेता माळी समाजातून राजकारणात स्वीकारला गेला नाही.  छगन भुजबळ यांचे राजकारणही माळी समाजाऐवजी स्वकेंद्रित आणि स्वकुटुंब केंद्रित राहिले . छगन भुजबळ यांची विदर्भातील बाहुबली म्हणून ओळखले जाणारे किशोर कन्हेरे यांनी आपल्या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आज अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला . मध्यंतरी त्यांनी जवळपास बारा वर्ष शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते म्हणूनही कार्य केले.  शिवसेनेत विदर्भात फार लक्ष दिले जात नसल्याने आणि माळी समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी राष्ट्रीय पक्ष सोबत असण्याची ...

समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा !

इमेज
  पृथ्वीवर स्वर्ग अवतरला आहे. आपल्या भारतात हा स्वर्गीय नजारा पहायला मिळत आहे. चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यांवर अंधारात चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या रहस्यमयी लाटा उसळल्या आहेत. चमकणाऱ्या लाटा हा एक नैसर्गिक चमत्कार नसून वैज्ञानिक चमत्कार असल्याचे संशोधक सांगतात. आहे. या लाटांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  तामिळनाडूतील चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यांवर या निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. चेन्नईतील नीलंकराई, इंजांबक्कम, विल्लुपुरम आणि मारक्कनम समुद्रकिनाऱ्यांवर या लाटा पहायला मिळत आहेत. या निळ्या रंगाच्या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहे. या लाटा पाहाण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटकांनी या लाटांचे व्हिडिओ आणि फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. 

दिल्लीमध्ये शाळेजवळ मोठा स्फोट

इमेज
  नवी दिल्ली :  आज सकाळी दिल्ली येथील एका शाळेजवळ भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. शाळेच्या एका भिंतीजवळ हा स्फोट झाला असून यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. मात्र संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्लीमधील प्रशांत विहार परिसरात स्फोट झाला. स्फोटानंतर लगेचच धुराचे मोठे लोट दिसू लागले. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांसह एफएसएलची टीम घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, हा स्फोट कोणत्या प्रकारचा होता आणि याबाबतचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. दिल्ली पोलिसांसह एफएसएलची टीम या घटनेबाबत अधिक तपास करत आहे.

ठाकरे गटाने निवडणूक चिन्ह बदललं?, विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी ओळख मिळणार

इमेज
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सुधारित 'मशाल' निवडणूक चिन्ह दिलं आहे. जून २०२२ मध्ये शिंदे गटाने शिवेसेनेतून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दोन तलवारी आणि ढाल हे चिन्ह मिळालं तर, उद्धव ठाकरेंच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, उद्धव गटाचे निवडणूक चिन्ह 'मशाल' हे आइस्क्रीमच्या कोनसारखं दिसतं असं म्हणत विरोधकांकडून खिल्ली उडवण्यात आली होती. त्यामुळे या निवडणूक चिन्हात थोडा बदल करण्यात आला असून निवडणूक चिन्हात 'मशाल' स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना ईव्हीएमवर सुधारित मशाल निवडणूक चिन्ह दिसणार आहे. पक्ष विभाजनानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मशाल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला निवडणूक चिन्ह म्...

बुलडाणामध्ये रविकांत तुपकर की जालिंधर बुधवत बुधवत, की जयश्री शेळके ?

इमेज
  -  जिल्ह्यात विधानसभेसाठीही लोकसभेचीच पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता? - रविकांत तुपकर हे आंबेडकरांच्याही संपर्कात; अपक्ष लढले तरी महाआघाडीला सहाही मतदारसंघात फटका निश्चित? बुलढाणा (खास प्रतिनिधी) - शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना महाआघाडीत घेऊन त्यांना बुलढाण्यातून उमेदवारी द्यावी, याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बहुतांश वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले असताना, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मात्र निष्ठावंत की उपरा? असा प्रश्न निर्माण झाला असून, निष्ठावंत जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, की शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना उमेदवारी द्यावी, की अ‍ॅड. जयश्रीताई शेळके यांना संधी द्यावी, असा गहन आणि मोठा राजकीय पेच उद्धव ठाकरे यांच्यापुढे निर्माण झाला असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. रविकांत तुपकर यांना महाआघाडीत घ्यावे, जेणे करून लोकसभेची पुनर्रावृत्ती टाळता येईल, व त्यांचा बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाडा व  विदर्भातील काही जागांवर राजकीय फायदा होईल, असा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाआघाडीच्या काही नेत्यांना विश्वास असल्याच...

बुलडाणा जिल्हयात भाजपाचे उमेदवार जाहिर !

इमेज
जामोदमधून डॉ.संजय कुटे, खामगाव ॲड आकाश फुंडकर, चिखली श्वेताताई महाले यांना  पुन्हा संधी  बुलडाणा :-  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 राजकारण आता चांगलंच पेटलं आहे. अशातच आज भाजपने  99 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपाने बुलडाणा जिल्हयात उमेदवार जाहिर केले असून जळगाव जामोदमधून डॉ.संजय कुटे तर खामगाव मधून ॲड आकाशदादा फुंडकर तर चिखली मधून श्वेताताई महाले यांची नावे जाहिर केले आहे.  भाजपाने पुन्हा बुलडाणा जिल्हयात डॉ.संजय कुटे,आकाश फुंडकर,श्वेताताई महाले यांना  पुन्हा संधी देण्यात आली.महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.राज्यात पहिल्यांदाच भाजप दोन मोठ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिगंणात उतरली आहे. अशावेळी महायुतीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून मागील काही दिवस तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर आज भाजपच्या पहिल्या यादीनंतर त्याबाबतचा सस्पेन्स हा काहीसा कमी झाला आहे 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने किती जागा लढवलेल्या ? 2019 च्या...

तानाजी सावंतांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला

इमेज
  विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, भेटी घेणे सुरू आहे, अशातच महायुतीशी संबंध चांगले असलेल्या नेत्यांचे संबधित काहीजण यावेळी शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याचं दिसून आलं. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वर पोहोचले आहेत. तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.  धैर्येशील मोहिते पाटलांनी याआधी पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील इच्छूक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती. यामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत देखील उपस्थित होते. त्यानंतर अनिल सावंत आज पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूकीसाठी अनिल सावंत इच्छूक आहेत. मात्र, ही जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छूक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रव...

महिला व बालविकास विभागाद्वारे 236 पदांवर भरती सुरू; या उमेदवारांना मोठी संधी!

इमेज
  महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाने विविध पदांसाठी एकूण 236 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, लिपिक, स्वयंपाकी आणि काळजी वाहक यांसारख्या पदांचा समावेश आहे. 14 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, 3 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. सरकारी नोकरीची संधी साधायची असेल तर ही भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. चला तर मग, आता आपण या लेखात वरील भरतीबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया. महिला बाल विकास विभाग भरती भरती करणारा विभाग: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग रिक्त पदांची संख्या: एकूण 236 पदांवर भरती करण्यात येणार आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 नोव्हेंबर 2024 Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 – पदांची माहिती जाहिरात क्रमांक: 01/2024 महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत खालील पदांसाठी भरती होणार आहे: संरक्षण अधिकारी (गट – ब...