गेल्या दोन ते तीन वर्षापासून बळीराजा शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने हैराण झाला आहे. शेंदरी बोंडअळी ही प्रामुख्याने कापूस या पिकावर आढळणारी एक कीड आहे. शेंदरी बोंडअळी कशी ओळखावी,ही अळी येण्याची कारणे,शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा,एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे यासंबधी विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कृषीक्रांती ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी मेहकर तालुक्यातील बरटाळा येथील शेतक-यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्रामध्ये दरवर्षी साधारपणे ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात येते. विदर्भ व मराठवाडा या विभागात कापूस लागवडीला अधिक प्राध्यान्य दिले जाते. शेंदरी बोंडअळी ही कापूस पिकावरील हानिकारक कीड आहे. ती बोंडाच्या आत राहून उपजिविका करते. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी क्रांती ग्रुपमध्ये शुभम वाळूकर,राजेश पाखरे,आकाश झनक,विकी तिरके,निखिल जाधव,ज्ञानेश्वर चौधरी,पारसा विरंजेनेलू,सुनीलकुमार आणि एस.गोपी या विद्याथ्र्यांचा समावेश आहे. विवेकानंद कृषीक्रांती ग्रुपच्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके,प्रा.शिवशंकर काकडे,प्रा.डॉ.भानुदास भोंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
असा
ओळखावा प्रादुर्भाव
कपाशीची फुले
पूर्णपणे न उमल्यास.हिरव्या बोंडावर डाग qकवा
छिद्र दिसल्यास शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.याशिवाय
कामगंध सापळयात नर पतंग अडकल्यास,उघडल्यास बोंडावरती गुलाबी
डाग दिल्यास कपाशीवरती शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याची प्रामुख्याने लक्षणे
दिसून येतात.
असे
करावे व्यवस्थापन
पावती
घेतल्याशिवाय कपाशी बियाण्यांची खरेदी टाळावी.कपाशीची लागवड वेळेवर करावी.दर
आठवडयाला किडीचाी पाहणी करावी.कपाशी पिकाच्या भोवताली आश्रय पिकाची पेरणी करावी.
याशिवाय भेंडी,अंबाडी,एरंडी व
झेंडू या सापळा पिकाची लागवड करावी. तीन महिन्यापर्यंत शक्यतोवर किटक नाशकांचा
वापर टाळावा.युरीयाचे जास्त प्रमाण टाळावे.
शेंदरी
बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात मोठया प्रमाणात घट येते. या किडीचे वेळीच व्यवस्थापन
न केल्यास नुकसान होते. एकात्मिक कीड व्यवस्थापनाने किड नियंत्रण करावे,
प्रा.शिवशंकर
काकडे विभाग प्रमुख कीटकशास्त्र कृषी महाविद्यालय
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा