Responsive Ads Here

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

बळीराजांनी फवारणी दरम्यान बाळगावी दक्षता !


ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी फवारणी दरम्यान कोणती काळजी घ्यावी, कोणत्या कीडनाशकाची खरेदी करावी, फवारणी कोणत्या वेळेस करावी, फवारणीचे द्रावण करतांना कोणती काळजी घ्यावी. शेतक-यांनी फवारणी तंत्रज्ञान शास्त्रशुध्द फवारणी कशी करावी याबाबत शास्त्रशुध्द पध्दतीने प्रात्यक्षिक माहिती विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या जय जिजाऊ,कृषी विधाता,कृषी संवादीनी ग्रुप,कृषी सखी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी ग्राम हिवरा बु येथील शेतकरी बांधवांना करून दाखविले. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या विद्यार्थीनींनी आयोजीत केलेल्या किटक नाशक फवारणी मार्गदर्शन सत्राचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शेकडो शेतक-यांना लाभ झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे किटकशास्त्र विभागाचे  प्राध्यापक शिवशंकर काकडे,प्रा.डॉ.भानुदास भोंडे,प्रा.मनोज खोडके तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत बोरे,रामजी राठोड,शिवलाल राठोड,प्रकाश शेळके,किशोर इंगळे तथा आदि उपस्थित होते.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या जय जिजाऊ,कृषी विधाता,कृषी संवादीनी ग्रुप,कृषी सखी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी शेतक-यांना फवारणी करतांना कशी करावी. उंच झाडावर फवारणी करतांना कोणती काळजी घ्यावी, फवारणी झाल्यानंतर किटकनाशकाच्या डब्याची विल्हेवाट कशी लावावी.  फवारणी केलेल्या क्षेत्रावर जनावरांना कधी कालावधी नंतर चारण्यासाठी न्यावे याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या जय जिजाऊ  ग्रुपमध्ये कु.अश्विनी घुगे,कु.अश्विनी इंगळे,कु.योगीता राठोड,कु.दिपाली गि-हे,कु.माधवी वाका,कु.हर्षा पवार,कु.मानसा पोलरू,कु.भारती नंदापुरे,कु.सलोनी लड्डा तसेच कृषी विधाता ग्रुप ,कृषी संवादिनी ग्रुप,कृषी सखी ग्रुपच्या  विद्यार्थीनींचा समावेश होता.  या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.डॉ.भानुदास भोंडे,प्रा.शिवशंकर काकडे,प्रा.मनोज खोडके  यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.अश्विनी घुगे तर आभार प्रदर्शन कु.अश्विनी इंगळे हिने मानले.

फवारणी दरम्यान अशी घ्यावी दक्षता
कीटकनाशका वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शेतक-यांनी हिरवा त्रिकोण असलेल्या कीडनाशकांची खरेदी करावी. शेतक-यांनी फवारणी करतांना हातमोजे,मास्क,टोपी,प्रान,पुर्ण पँट गाँगल इत्यादीचा वापर करावा. फवारणी दरम्यान नाक,कान,डोळे याचे रक्षण करावे. फावरणी दरम्यान लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना दुर ठेवावे.  फवारणी करतांना वापरलेली भांडी,साहित्य, नदी किंवा विहिरीजवळ धुणे टाळावे. फवारणी नंतर साबनाने हात पाय स्वच्छ धुवावे.

शेतक-यांनी फवारणीचे तंत्र अवगत करावे - प्रा.शिवशंकर काकडे
शेतकरी बांधवांनी फवारणी करतांना वा-याचा वेग,दिशा,पर्जन्यमान,वेळ या बाबींवर कटाक्षाने लक्ष ठेवावे. शेतकरी बांधवांनी वा-याच्या विरूध्द दिशेने फवारणी करून नये. स्वयंचलीत फवारणी यंत्र असल्यास किटकनाशकाची मात्र तिप्पट करावी. फवारणीचे द्रावण ढवळून नंतरच फवारणी यंत्रात गाळून भरावे. किटकनाशकाचा वास घेणे,सुंगणे टाळावे. कारण असे केल्यामुळे श्वासोच्छवासाव्दारे विषबाधा होवू शकते. फवारणी करतांना हातमोजे,संरक्षक कपडे वापरावे.

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण  भागातील शेतक-यांना फवारणी संबंधी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या फवारणी तंत्रज्ञान मार्गदर्शनाचा शेकडो शेतक-यांना लाभ झाला.
                                                               डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या विद्यार्थीनी शेतक-यांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्नशील आहोत. फवारणी करतांना कोणती खबरदारी घ्यावी याबाबत आम्ही हिवरा आश्रम येथील शेतकरी बांधवांना मागर्दशन केले. या मार्गदर्शनाचा निश्चित शेतकरी बांधवांना फायदा होईल.
                                                                                       भावना सरोदे, विवेकानंद कृषी महाविद्यालय

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या विद्यार्थीनींनी फवारणी कशी करावी.फवारणी दरम्यान कोणती काळजी घ्यावी यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आम्हा शेतक-यांना याचा खूप फायदा झाला.
प्रशांत बोरे,शेतकरी हिवरा बु.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा