ग्रामीण भागातील तरूणांनी घेतली उदयोगात भरारी


उद्योगातून स्थानिक भागातील अनेक तरुणांना मिळाला रोजगार


पुरी वायरनेल्स चे उद्घाटन करतांना आश्रमाचे  जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले ,अध्यक्ष सेवाव्रती आर.बी .मालपाणी व इतर 


उम्मीदों की कश्ती को डुबोया नही करते...मंजिल दूर हो तो थक कर रोया नही करते...रखते है जो दिल में उम्मीद कुछ पाने की...वो लोग जिंदगी मे कुछ खोया नही करते...जीवनातील स्वप्नांना कृतीची पंख लावून यशाची गगन भरारी घेण्याची कला,धाडस व साहस फारच थोडया लोकांना अवगत होते. जी व्यक्ती आपल्या उराशी यशाची स्वप्ने बाळगतात त्याच्या यशाच्या मार्गात कितीही अडचणी अथवा संकटे आली तरी ते न घाबराता ज्योपर्यंत ध्येय,यश मिळत नाही अथक प्रयत्न करीत राहतात. याचा प्रत्यय हिवरा आश्रम येथील संदीप हरिदास पुरी,ओम हरिदास पुरी व भगवान सुंदर पुरी या तीन उच्च विद्याविभुषीत पुरी या सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या कुटूंबीयांकडे पाहून येतो. कुठल्याही प्रकारी व्यावसायिक पार्श्वभूमी अथवा कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन नसतांना स्वयंप्रेरणेतून त्यांनी हिवरा आश्रम सारख्या छोटया गावामध्ये वीस लाख भांडवलातून पुरी वायरनेल्स हा छोटा उदयोग उभारला आहे. ग्रामीण भागात लोखंडी खिळे निर्मितीचा हा  पहिलाच उदयोग उभारणीचे धाडस पुरी भावंडानी दाखविले आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या कायम सानिध्यात व संस्कारात लहानाचे मोठे झालेले  संदीप पुरी,ओम पुरी व भगवान पुरी यांचा ग्रामीण भागातील उदयोग उभारून तरूणांना प्रेरणा दिली आहे. ग्रामीण भागातील तरूणाईच्या मानसिकतेत बदल होत असून आजचा तरूण नोकरीच्या मागे न लागता उदयोगाच्या दिशेने वळत असल्याचे विधायक चित्र दिसून येत आहे. जिद्द, जिकाटी व मेहनतीच्या बळावर येणा-या काळात हा उदयोग वाढविणार असल्याचाही मनोदय  पुरी भावडांनी दैनिक सकाळशी बोलतांना व्यक्त केला.

रोजगार निर्मितीवर देणार भर
पुरी वायरनेल्स मध्ये एक इंची लोखडी खिळयापासून ते चार इंची खिळ्यांची निर्मिती होत आहे. येणा-या काळात ग्रामीण भागातील अधिक लोकांना उदयोगाच्या माध्यामातून रोजगार उपलब्ध करून देणार आहे.

उदयोग सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचा अथवा मागणी पुरवठा व उदयोगाशी निगडीत बाबींचा आम्ही अभ्यास केला असून आम्हाला निश्चित उदयोगात यश मिळेल. भावनेच्या भरात उदयोग सुरू केला नाहीतर व्यावसायिकता अंगी बाळगून उद्योग सुरु केला.
                                                                 संदीप पुरी हिवरा आश्रम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा