Responsive Ads Here

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

खांदेकरी बनून महिलांची सामाजिक परिवर्तनास सुरूवात



हिवरा आश्रम येथील महिला बनल्या वडीलांच्या खांदेकरी


वडीलांच्या निधनाची वार्ता कानी पडताक्षणी मुलींना अनावर झालेले दुःख... आश्रुंनी डबडबले डोळे, खिन्न व उदास  झालेले चेहरे...कायम हुंदक्याचा आवाज... मात्र झालेल्या दुखातून स्वतःला सावरत व आईला धीर देत हिवरा आश्रम येथील चार मुली वडीलांच्या खांदेकरी बनल्या. रूढी व परंपरेच्या चौकटीतून बाहेर पडत वडीलांच्या खांदेकरी बनून या महिलांनी नव्या सामाजिक परिवर्तनाची खरी सुरूवात केली. हिवरा आश्रम येथील महिलांनी वडिलाचे खांदेकरी बनत समाजापुढे नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. स्त्री ही त्याग, नम्रता, श्रध्दा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. आजची स्त्री पुरूषासोबत प्रत्येक क्षेत्रात काम करीत आहे. आपले कर्तुत्वाने तिने अनेक यशाच्या वाटा पादाक्रांत केल्या असून तीने वेळोवेळी आपली क्षमता व  सिद्धता  दाखवून दिली आहे. हिवरा आश्रम येथील मुलीनी वडिलांचे खांदेकरी बनून समाजाला स्त्री शक्तीची जाणीव करून दिली आहे. हिवरा आश्रम येथील रामकृष्ण खंडूजी खिल्लारे हे शिव जयंतीच्या शुभ पर्वावर अल्पशा आजाराने निधन पावले. रामकृष्ण खिल्लारी हे  सुस्वभावी, धार्मिक प्रवृत्ती व पंचागशास्त्राचे अभ्यासक होते. हिवरा आश्रम येथील मुली वडीलांच्या खांदेकरी बनल्याने ख-या अर्थाने मुलगीच वंशाचा दिवा असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. रामकृष्ण खिल्लारी यांच्या पश्चात पत्नी व ५ मुली असा परिवार आहे. त्याचा मुलगा पुरूषोत्तम याचा काहीवर्षापूर्वी अपघातात मृत्य झाला होता. बालपणी  ज्या वडीलांच्या अंगाखांदयावर खेळलो...ज्यांनी प्रत्येक हट्ट पुरविण्यासाठी जीवाचे रान केले... त्याच आपल्या वडीलांना आपला खांदयाचा आधार मिळाला... त्याच आपल्या वडीलांचे खांदेकरी होण्याच्या मुलींच्या निणर्यामुळे सर्व महिलांसमोर नवा आदर्श प्रस्थापित झाला आहे. रामकृष्ण खिल्लारी यांना खांदा देण्यासाठी त्यांच्या मुली सौ.कुसुमबाई निकम रा.नायगांव,सौ.वर्षा गारोळे रा.परतापूर,सौ.संगीता कबाडे रा.उकळी,सौ.सुनिता कुटे रा.शेलगाव देशमुख,पुष्पा खिल्लारी रा.हिवरा आश्रम यांनी वडीलांच्या खांदेकरी बनल्या होत्या.  ऐकऐकीकडे  आजसुध्दा स्त्रीयांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या उदासीन वृत्तीत अजून सुध्दा  बदल झाला नसल्याचे दिसून येत आहे. वर्तमानपत्रात दररोज स्त्रीभ्रूणहत्या व स्त्री अत्याचारांच्या बातम्या नजरेखाली आल्याशिवाय राहत नाही. आजची स्त्री समानतेसाठी अजून लढत असतांना मात्र हिवरा आश्रम येथील रामकृष्ण खंडूजी खिल्लारी यांच्या  चार मुलींनी खांदा देवून आपले कर्तव्य पूर्ण केले. अंत्यसंस्काराच्या वेळीस आई-वडीलांना मुलगा व मुलगी समान असते. मुली सुध्दा आपल्या आईवडीलांच्या सेवत कुठेही कमी पडत नसल्याचे पुन्हा एकदा समाजाला आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा