संतोष थोरहाते हे संत साहित्याचे अभ्यासक असून एक नामवंत पत्रकार,योगप्रचारक,ग्राफिक्स डिझानर म्हणून सुद्धा ते परिचित आहेत. विवेकानंदाच्या विचारांचा अत्यंत प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर दिसून येतो. संतोष थोरहाते हे सध्या जनसंपर्क कार्यालय कार्यरत आहेत.
संतोष थोरहाते : ""एक तत्व नाम दृढ धरी मना"
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
संतोष थोरहाते : ""एक तत्व नाम दृढ धरी मना": मनुष्याला मानव जन्म महत भाग्याने मिळालेला आहे.जन्माला आल्यानंतर हया ठिकाणी मनुष्याला सुख दुःख ,आशा निराशा,प्रतिकुल अनुकुल अशा अने...
० ब्रिक्स परिषदेसोबत संपूर्ण जगाची नजर पंतप्रधान मोदींवर ० परिषदेत आर्थिक सहकार, जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी BRICS परिषदेसाठी दोन दिवसांच्या २२-२३ ऑक्टोबर दौऱ्यासाठी रशियाच्या कझान शहराच्या दिशेने रवाना झाले आहेत. ब्रिक्स परिषदेसोबत संपूर्ण जगाची नजर पंतप्रधान मोदींवर असणार आहे. ते रशियामध्ये कोणत्या देशांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील यावर साऱ्यांच्या नजरा असणार आहेत. रशियात भारताचे राजदूत विनय कुमार यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी कझानमध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या समकक्षांसह द्विपक्षीय बैठक करतील. सूत्रांच्या माहितीनुसार, या परिषदेत आर्थिक सहकार, जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. काय आहे BRICS ब्रिक्स हा असा समूह आहे जो जगातील ४५ टक्के लोकसंख्या, जगातील ३३ टक्के जमीन आणि जगातील २८ टक्के अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतो. ब्रिक्सला BRIC या नावाने ओळखले जात होते. याची स्थापना २००६मध्ये सेंट पीटर्सबर्गमध्ये झाली. पहिल्या ब्रिक शिखर परिषदेचे आयोजन २००९ मध...
मुंबई : निवडणूक मग कोणतीही असली तरी स्पर्धेतील उमेदवारांकडून अर्ज भरताना चांगल्या मुहूर्ताची वाट बघितली जाते. चांगला दिवस, त्या दिवसातील चांगली वेळ याचे गणित बघूनच अर्ज भरला जाण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असली, तरी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधण्यासाठी बहुतांश मतदारसंघांत २४ ऑक्टोबर रोजीच अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी आहे. यापैकी २७ ऑक्टोबरचा रविवार वगळता सहाही दिवस अर्ज भरता येणार आहेत. विशेष म्हणजे हे सहाही दिवस शुभ आहेत. अर्ज माघारीसाठी मात्र दिवाळीनंतरच पडद्यामागच्या हालचालींना वेग येणार आहे. २२ ते २९ ऑक्टोबर या काळात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. या सात दिवसांत एकच रविवार येतो, अन्य सर्व सहाही दिवस शासकीय सुटी नसल्याने यादिवशी अर्ज भरता येणार आहेत. त्यातही २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत आहे. हा दिवस शुभ मानला जातो, त्यामुळेच याच दिवशी अर्ज भरण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात गर्दी होण्याची शक्यता आहे. २४ ऑक्टोबरशिवाय २...
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, भेटी घेणे सुरू आहे, अशातच महायुतीशी संबंध चांगले असलेल्या नेत्यांचे संबधित काहीजण यावेळी शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याचं दिसून आलं. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वर पोहोचले आहेत. तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. धैर्येशील मोहिते पाटलांनी याआधी पंढरपूर आणि मंगळवेढ्यातील इच्छूक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती. यामध्ये तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत देखील उपस्थित होते. त्यानंतर अनिल सावंत आज पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूकीसाठी अनिल सावंत इच्छूक आहेत. मात्र, ही जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके हे दाघेही या जागेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छूक असून यांचाही प्रयत्न राष्ट्रव...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा