ग्रामीण भागात रूजतोय सिनेमॅटिक वेडींगचा ट्रेंड

ग्रामीण भागात रूजतोय सिनेमॅटिक वेडींगचा ट्रेंड

शहरी भागाबरोबर आता ग्रामीण भागातील लग्नसमारंभाच्या क्षणांची सोनेरी आठवणी जपून ठेवण्यासाठी सिनेमॅटिक प्री वेडींग शूटला युवक- युवती प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. काळाच्या ओघात छायाचित्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लग्नसंमारंभाचे अविस्मरणीय क्षण व सोनेरी आठवणींना हायटेकचे स्वरूप दिले आहे. विवाहाच्या आठवणींच्या संचाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम फोटो करीत असतात. वधु- वरांच्या आयुष्यातील सुखद क्षणाच्या भावना टिपण्याचे मोठे आव्हाण छायाचित्रकार करीत असतो. ग्रामीण भागात सिनेमॅटिक प्री वेडींग शूटचा ट्रेंड रूचत आहे. ग्रामीण भागात  सिनेमॅटिक प्री वेडींग व पोस्ट वेडींगसाठी तरूणांकडून अधिक मागणी होत आहे. विवाह समारंभ म्हटला कीदोन जिवांच्या मिलनाचा सुखद, हळवा व कायम स्मृतीपटलावर कोरला जाणारा क्षण... भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्काराला महत्व आहे. विवाहाच्या प्रत्येक क्षणांची आठवण चीरकाल टिकून राहावी म्हणून प्रत्येकाच्या जीवनात फोटोग्राफीला अन्यसाधारण असे महत्व आहे. सोशल मिडीयाच्या काळात लग्नसमारंभाच्या फोटोग्राफीत तसेच वधू-वराच्या आवडी निवडीत बदल होत गेला. त्यातून ग्रामीण भागातील युवक युवती सिनेमॅटिक प्री वेडींग व पोस्ट वेडींग चा ट्रेंड ग्रामीण भागात रूचत असल्याचे दिसून येत आहे. 
ज्या तरूणांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांच्यासाठी सिनेमॅटिक फोटोग्राफी हा करिअरसाठी सुध्दा उत्तम पर्याय आहे. सृजनशीलतेसोबत कल्पनाशक्ती व मेहनत करण्याची तयारी असेल कुशल वेडिंग फोटोग्राफर तयार होतो.

सिनेमॅटीक फोटोग्राफीची भूरळ
सिनेमॅटिक प्री वेडिंग व पोस्ट वेडिंग या फोटोग्राफीतील नाविन्यपूर्ण प्रकाराने आजच्या युवक -युवतीला भुरळ घातली असून त्यांचे मन हेरल आहे. तो व ती कसे भेटले आणि लग्नाची गाठ बांधण्यापर्यंतच्या सुखद क्षणांची फुलती, बहरती नात्यांची सुगंधी आठवणी आधुनिक तंत्राच्या मदतीने सिनेमॅटिक व्हिडीओ रूपात कॅमे-यात कैद केली जाते.  

असा होतो सिनेमॅटीक शूट
सिनेमॅटीक फोटोग्राफी शूटसाठी एफ एक्स कॅमेरे,टेलीफोटो लेन्स,मायक्रो लेन्स,जेमी क्रेन,स्लाईडर, टिगर प्लॅश,ड्रोन कॅमेरा,रिफेल्क्टर इत्यादीचा सुयोग पध्दतीने वापर करून व फोटोग्राफरच्या कल्पकदृष्टीकोनातून सिनेमॅटिक वेडींग शूट तयार केला जातो. सोशल मीडीयाच्या काळात आपली फोटो किंवा व्हिडीओ शूट वेगळया स्पेशल इफेक्टमध्ये आवडत असल्याने वधू वरांची सिनेमॅटिक प्री वेडिंग शूटला जास्त पसंती मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा