Responsive Ads Here

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

गाडगे बाबांच्या विचारांनी समाजाला तारले - संतोष गोरे


विवेकानंद विद्या मंदिरात गाडगेबाबा जयंती संपन्न

हिवरा आश्रम,ता.२५: गाडगे बाबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या उत्कर्षासाठी व समाजोन्नतीसाठी वेचले. गाडगे बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंध्दश्रध्दा निर्मूलन,शिक्षणाचा प्रचार प्रसाराचे मोठे कार्य केले. बाबांनी आपल्या साध्या सोप्या कीर्तनातून जनमानसाचे प्रबोधन करीत सत्य तेच समाजापुढे मांडले. गाडगे बाबांच्या विचाराने समाजाला तारले असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी  बोलतांना व्यक्त केले.
येथील येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिरात आयोजित संत गाडगे बाबा यांच्या जयंती प्रसंगी शनिवारी (दि.२४) रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात  संत गाडगे बाबांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमाचे सचिव संतोष गोरे तर प्रमुख पाहुणे सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त अशोक गि-हे,प्राचार्य निवृत्ती शिंदे,उपप्राचार्य अणाजी सिरसाठ तथा आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना गोरे म्हणाले की, .समाजातील रंजल्या गांजल्यात देव आहे त्यांची सेवा करा असे समाजाला शिकवण दिली. गाडगेबाबांनी समाजातील गरिबी, अशिक्षितपणा, अंध्दश्रध्दा, दारू,कर्ज काढून सण साजरे करणे,पशूबळी अशा मागासलेल्या समाजाचे प्रबोधन केले असल्याचे ही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.
कार्यक्रम सूत्रसंचालन संजय भारती यांनी तर आभार प्रदर्शन सुजित दिवटे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा