पर्यावरण संवर्धनासाठी लहाने कुटुंबीय सरसावले !


रक्षा विसर्जनस्थळी केले वृक्षारोपन,रूढीला बगल देवून केले समाजपरिर्वतन


समाजसुधारकाची एक दैदिप्यमान परंपरा महराष्ट्र राज्याला लाभली आहे. या समाजसुधारकांनी वैचारीक विचार मंथनातून समाजातील अनेक अनिष्ठ चालीरीतीरूढी व परंपरावरवेळोवेळी आघात करून त्या कशा फोल व असत्य आहे त्या पटवून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. याचा प्रत्यय येथूनच जवळ असलेल्या लव्हाळा येथे दिसून आला. लव्हाळा येथील लहाने कुटूंबीयानी वडिलांच्या रक्षाविसर्जनाच्या प्रसंगी रूढी व परंपरेला बाजूला सारत मेहकर पं.स.चे माजी उपसभापती बबनराव लहाने,दिनकरराव लहाने,शिवसाही प्रतिष्ठाणचे तथा जि.प.बुलडाणा सदस्य दत्तात्रय लहाने यांनी वडीलांच्या रक्षाचे नदीच्या पाण्यात विसर्जन न करता शेतात एक खड्डा खणुन त्यामध्ये रक्षा व माती मिसळून त्याठिकाणी आंब्याच्या झाडाचे लागवड करीत समाजापुढे एक नवा आदर्श प्रस्थापित करत पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना प्रेरणा दिली आहे.
कवी केशव सुतांनी सुध्दा आपल्या तुतारी या कवितेतून समाजपरिवर्तनासाठी सज्ज झालेल्या नवतरूणाच्या माध्यमातून समाजामध्ये समाजपरिवर्तनाची जणू मुहूर्तमेठ रोवत समाजजागृतीचे कार्य केले. जुने जाऊ द्या मरणालागुनी...जाळुनी किंवा पुरुनी टाका...सडत न एक्या ठायी ठाका...सावध! ऐका पुढल्या हाका...
खांद्यास चला खांदा भिडवूनी... केशवसुतांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून समाजातील रूढी व परंपरेवर शाब्दीक प्रहार करून समाजमनामध्ये परिवर्तनवादी विचारांचे बीजारोपन करून त्यांना रूढी व परंपरेच्या जोखडातून मुक्त केले आहे.
मेहकर पंचायत समितीचे माजी उपसभापती बबनराव लहाने,दिनकरराव लहाने यांचे वडिल तर संस्थापक शिवशाही प्रतिष्ठाण तथा जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय लहाने यांचे काका वै.नारायणराव लहाने यांचे गुरूवारी दि.२२ रोजी निधन झाले. वडिलांच्या रक्षाविसर्जनाच्या दिवशी बबनराव लहाने,दिनकरराव लहाने,दत्तात्रय लहाने व लहाने कुटूंबीयांनी जुन्या रूढी व पंरपरेला बाजूला सारत आपल्या शेतात खड्डा खोदून त्यात काळीमाती व रक्षा एकत्र करून त्याठिकाणी आंब्याच्या झाड लावले.त्यांनी आपल्या कृतीतून समाजपरिवर्तनवादी विचारांना चालना देत ग्रामीण भागातील जनतेसमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. याप्रसंगी आमदार डॉ.संजय रायमुलकर,सामाजिक कार्यकर्ते तथा पाचार्य पंढरीनाथ शेळके,जिल्हासेवादलाचे संतोष पाटील,कृ.उ.बा.चे सभापती माधवराव जाधव,तालुका सेना प्रमुख सुरेशतात्या वाळूकर,जि.प.मा.कृषि सभापती नंदुभाउ बोरे,राष्ट्र वादीचे नेते नरेंद्र शेळके,अ‍ॅड सुरेश वानखेडे,जि.प.सदस्य संजय वडतकर,भाजपाचे उध्दव काळे तथा आप्तेष्ट,स्नेहीजण मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

आधुनिक काळात रूढी,परंपरा व चालीरीतीना कवटाळत परीवर्तनवादी विचारांची कास धरावी म्हणून प्रत्येकाने काळानुरूप आपल्या विचारात बदल केले पाहिजेत.
                                                     बबनराव लहाने, मेहकर पं.स. माजी उपसभापती


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम

मो ९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा