विवेकानंद आश्रमात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा


महाराष्ट्रभर संपन्न झालेला २७ फेब्रुवारी हा वि.वा.शिरवाडकरांचा जन्मदिनमराठी भाषादिन विवेकानंद आश्रमात सुध्दा अत्यंत उत्साहाने व काव्यवाचनाच्या कार्यक्रमाने बुधवारी (दि.२८) रोजी  संपन्न झाला. विवेकानंद विद्यामंदिराच्या  व्यासपीठावर रात्री ८ वाजता झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे होते. कार्यक्रमाची सुरूवात वि.वा.शिरवाडकर ,स्वामी विवेकानंद व कर्मयोगी संत प.पू. प.पू.शुकादास महाराजांच्या प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी काव्य वाचनाच्या बहारदार कार्यक्रमात कवी संजय भारती,अनंत शळकेबबन महामुने,रमेश पवारईश्वर मगरपंढरीनाथ शळकेबी.टी.सरकटेकेवलानंद टवलारेज्ञानेश्वर गाढे  यांनी आपल्या कविता सदर केल्या. या वेळी व्यासपीठावर विद्या मंदिराचे उपप्राचार्य अनाजी सिरसाठआश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहातेविस्वत अशोक गि-हे आदींची उपस्थित होते. अनुभूतीतील काव्य हे मानवी जीवनाला परिपूर्णतेकडे नेणारे आहे. जीवनाच्या सर्वांगाला स्पर्शून जाणारे कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजांचे अभंग मराठी साहित्यात मोलाची भर घालत असल्याचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी सांगितले. मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येकाने आपले दैनंदिन व्यवहार मातृभाषेतच करण्याचा निश्चय करावा. गरजेचे असल्यासच इतर भाषेचा वापर करावा. कारण समृद्ध असलेली मराठी भाषा शुद्ध स्वरूपातच पुढील पिढीच्या हवाली करतांना त्यात काही शब्दांचे भर घालण्याचे कर्तव्य आपल्याला करावे लागणार असल्याचे विचार संतोष गोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संजय भारती यांनी केले तर  आभार प्रदर्शन रमेश पवार यांनी केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा