स्वार्थाने विनाश अटळ-स्वामी हरिचैतन्यानंद महाराज

श्रीराम कथा अखिल मानव जातीसाठी कल्याणकारी आहे. कथेच्या श्रवणाने जीवनाला कल्याणाचा मार्ग सापडतो.विकार मानसाला विनाशाकडे घेवून जातात तर सदाचरणाने मनुष्य देवत्वापर्यंत पोहचू शकतो. स्वार्थ हा सदाचरणातील मोठा अडथळा प्रभू रामचंद्राला राज्यभिषकाऐवजी वनात पाठविण्याची योजना करणा-या कैकयीची मती स्वार्थाने कुंठीत झाली होती. स्वार्थाने कैकयी विवेकशून्य झाली होती. त्यामुळे रामाला वनवास प्राप्त झाला.स्वार्थ माणसाला अवनतीच्या कोणत्याही पातळीपर्यंत घेवून जातो व स्वार्थाने विनाश अटळ ठरतो असे भावपूर्ण चिंतन स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज यांनी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संजीवन समाधी निमित्त दि.२२ ते २५ मार्च विवेकानंद आश्रमात आयोजित संगीत रामकथेत आजच्या दुस-या दिवशी बोलतांना व्यक्त केले.
कथेसाठी परिसरातील भाविकांनी अलोट गर्दी केली असून आश्रम परिसर भक्तीरसात डबून गेला आहे. माणसाने कसं वागावं याचा आदर्शपाठ म्हणजे रामायण आहे, तर माणसं कसं वागतात ते महाभारतात पाहायला मिळतं. आदर्श राजा कसा असावा, असा प्रश्न विचारला की आजही रामासारखा, असं उत्तर येतं. रामराज्य यावं, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जातात. यावरून रामकथेचं महत्त्व अधोरेखित होतं. महाभारताची महाकाव्य म्हणून ओळख आहे. रामकथेच्या श्रवणाशिवाय जीवनाला परिपूर्णता नसून जीवनातल्या प्रत्येक वळणावर निर्माण होणा-या समस्येचे व दुःखाचे निराकरण रामकथेतूनच होते. रामायण जगण्याची दिशा देते. प्रत्येक नात्याशी वागण्याच्या जबाबदारीचे भान रामकथेतून मिळते. भारतीय समाज पुण्यवंत आहे कारण या देशातील लोकांचे आदर्श प्रभू रामचंद्र आहे हे विचारही त्यांनी आपल्या विवेचनातून व्यक्त केले.

लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम

मो ९९२३२०९६५८

२ टिप्पण्या: