भाविकांना होणार महाप्रसादाचे वितरण, श्रीराम कथेने होणार समारोप
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांचा प्रथम
संजीवन समाधी सोहळ्याची रविवारी (दि.२५) रामनवमी रोजी राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता
होत आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या संजीवन सोहळयाचे साक्षीदार
होण्यासाठी हजारो भाविक विवेकानंद आश्रमात दाखल झाले आहे. विवेकानंद आश्रमच्या वाटिकेत असलेल्या कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संजीवन
समाधीच्या दर्शनासाठी व
आजच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून हजारो भाविक आश्रमात दाखल झाले असून
प्रत्येकजण महाराजांच्या आठवणीने भावूक बनला आहे. विवेकानंद आश्रमात कर्मयोगी संत
प.पू.शुकदास महाराजांच्या संजीवन समाधी सोहळया निमित्ताने संगीत श्रीराम कथेचे
दि.२२ मार्च ते २५ मार्च पर्यंत आयोजन सुध्दा केले होते. या श्रीराम कथेचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

महाप्रसादासही लोकांचा
हातभार!
कर्मयोगी संत प.पू. शुकदास
महाराजांनी वैयक्तीक खर्चासाठी संस्थेच्या तिजोरीतून एक रुपयाही घेतला नाही.
उलटपक्षी रात्रंदिवस वैद्यकीय सेवा करून कष्टाचा पैसा संस्थेला दिला. भाविकांनी महाराजांच्या
समाधीस्थ महानिर्वाणानिमित्त दिला जाणा-या महापंगतीचा खर्च उचलला आहे.
भाविकांच्या गर्दीने फुलला
आश्रम
कर्मयागी संत प.पू.शुकदास
महाराज संजवीन समाधी सोहळयानिमित्ताने आश्रमात विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले होते. श्रीराम कथा श्रवणासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या गर्दीने
विवेकानंद आश्रम फुलून गेला होता.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास
महाराजांनी ख-या अर्थाने स्वामी विवेकानंदांच्या विचारांची ग्रामीण भागात प्रचार
प्रसार करण्याचे अलौकीक कार्य करून दीन दुखीतांच्या जीवनात आनंद फुलविला. विवेकानंद आश्रम व
प.पू.शुकदास महाराजांवर नितांत प्रेम करणारे हजारो भाविक संजीवन समाधी सोहळयाठी
दाखल झाले आहे.
शिवप्रसाद
थुट्टे,रायपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा