उन्हाळयात जेष्ठांनी आरोग्याबाबत ठेवावी जागरूकता !

उन्हाळ्यामध्ये जेष्ठ नागरिकांना आरोग्याशी सबंधित विविध त्रासाला सामोरे जावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी त्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. वेळेवर व संतुलित आहार घेतल्यास त्रासावर नियंत्रण मिळविता येऊ शकते.
उन्हाळयाची दाहकता सर्वांना नकोशी असते. जेष्ठांसाठी तर उन्हाळा शारीरीक कारणामुळे अधिक त्रासदायक होतो. उन्हाळा हा ब-याच आरोग्य समस्यांचे मूळ हे मुळ आहार व पचन संस्थेत होणा-या बदलातून दिसून येते. या काळात जेष्ठांच्या पित्तामध्ये वाढ होते. उन्हाळयात उष्णतेत वाढ होवून शरीरातील व आतडयातील स्निग्धता कमी होते. त्यामुळे उन्हाळयात जेष्ठांनी शक्यतो पचनास कठीण असे अन्न घेणे टाळावे. या काळात जेष्ठांच्या शरीरातील पाण्याची गरज वाढत असल्यामुळे जेष्ठांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे. मनुष्याच्या आहारातील प्रथिने,कर्बोदके,स्निग्ध पदार्थ,जीवनसत्वे,मिनरल्स आणि पाणी हे प्रमुख अन्नघटक आहेत. बदलत्या ॠतुनुसार जेष्ठांनी योग्य आहार घेतल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जेष्ठांनी उन्हाळयातील आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास उन्हाळयातही जेष्ठांचे उत्तम आरोग्य राहते.
उन्हाळयामध्ये जेष्ठांना उन,गरमी,धूळ,धाम,थकवा याशिवाय एलर्जी सोबत त्वचेचे आजार,डोळयाचे आजारात सुध्दा वाढ होत असल्यामुळे जेष्ठांनी उन्हाळयामध्ये आपल्या आरोग्याबाबत अधिक जागृक राहण्याची गरज असते. जेष्ठांनी उन्हाळ्यात संत्रेमोसंबीकिलगडखरबूजअंगूरआंबाअशा रसयुक्त फळांचा आहारात समावेश करावा. जेष्ठांनी दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.  आहारात साहजिकच हलके अन्न घ्यावे व एका वेळी जास्त आहार घेण्यापेक्षा थोडय़ा थोडय़ा वेळाने कमी आहार घ्यावा. उन्हाळयामध्ये सुका मेवाअंडीमसालेदार पदार्थचाटमांसाहारी अन्न टाळावे.

उन्हाळ्यातील असा घ्यावा आहार
उन्हाळयात  सूर्याच्या उष्णतेत वाढ झाल्यामुळे शरीरातील व आतडय़ातील स्निग्धता नष्ट होते. त्यामुळे जेष्ठांनी कुठलाही या ऋतुंमध्ये जड अन्न  घेणे शक्यतो टाळावे. उन्हाळयात शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याची गरज वाढते. जेष्ठांनी उन्हाळयामध्ये दुध,दही,ताक,लस्सी यांचा वापर आहारामध्ये करावा. उन्हाळयामध्ये आहारात भात,भाकरीचा समावेश करावा.फ्रिजमधील अतिथंड पाणी पिणे शक्यतो टाळावे.

उन्हाळ्यातील आजार 
उन्हाळ्यातील प्रामुख्याने पुढील आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. यामध्ये  उष्माघात जंतुसंसर्ग डायरियाडिसेंटड्ढीकावीळटायफॉईड,डोळ्यांचे आजार, कंजक्टिव्हायटीस,त्वचेचे आजारमूतखडालघवी मार्गाचा जंतुसंसर्ग हे आजार उन्हाळयामध्ये जेष्ठांना उदभवतात.

जेष्ठांनी उष्माघातापासून संरक्षणासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. उन्हाळयामध्ये सुती कपडे वापरावीत. जेष्ठांना आपल्या आरोग्यात कुठल्याही प्रकारचा बिघाड वाटलास वैद्यकिय सल्ला घ्यावा.
                                 डॉ.गजानन गि-हे वैद्यकिय अधिकारी विवेकानंद आश्रम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा