Responsive Ads Here

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

तन मनाच्या सदृढतेने यशप्राप्ती- नायब तहसीलदार श्रीमती जायगुडे






जीवनातील उच्च ध्येय प्राप्तीसाठी संघर्ष करावा लागतो. मुलींनी आर्थिक दृष्टया समृध्द होण्यासाठी अभ्यासाच्या माध्यमातून प्रयत्नाची पराकाष्ठा करावी. स्पर्धा परिक्षेतूनच विविध नागरीसेवा करण्याची संधी मिळते व समाजाच्या व स्वतःच्या उत्कर्षासाठी महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परिक्षांची तयारी करावी. त्यात यशस्वी होण्यासाठी शारीरीक दृष्टया फिट व मानसिक दृष्टया सक्षम असावे लागते म्हणजेच तन मनाच्या सदृढतेने यशप्राप्ती होते असे विचार मेहकरच्या नायब तहसीलदार श्रीमती वैषाली जायगुडे यांनी गुरूवार (दि.९) रोजी केले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमात आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर अ‍ॅड रूपाली लोहिया,डॉ.वर्षा लखोटीया,अंकुर साहित्य संमेलनाच्या जिल्हाध्यक्षा विद्या खडसेसरपंच सौ. निर्मला डाखोरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून गरजूनां औषधी वितरण करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थीनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महिलांनी त्यांच्या बाजूने असलेल्या कायदयाचा व संधीचा लाभ घ्यावा. महिलांच्या संरक्षणार्थ तयार केलेले कायदे सर्वसामान्य महिलेपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड लोहिया यांनी बोलतांना सांगीतले.
महिलांनी आरोग्याच्या बाबतीत जागृक राहावे. योग्य आहार,निद्रा व योग प्राणायामाने शरीर निरोगी ठेवता येते. महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात व त्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. महिलांनी स्वताच्या आरोग्यासाठी वेळ राखावे असे आवाहन स्त्रीरोगतज्ञ डॉ.वर्षा लखोटीया यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील कु.जुही वानखेडे, कु.शिवानी रडाळे यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.श्रध्दा हुसे व कु.सोनल कणाके तर आभार प्रदर्शन कु.स्वाती शिंगणे हिने केले. तर या  महिला दिनाच्या कार्यक्रमाला गावातील वेगवेगळया क्षेत्रातील दोनशे ते अडीशे महिलांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी सर्व महिलांचा विवेकानंद आश्रमाच्या वतीने गौरव करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा