Responsive Ads Here

रविवार, ४ मार्च, २०१८

सुजलाम् सुफलाम् साठी लोकसहभागाची गरज - तहसिलदार संतोष काकडे

हिवरा आश्रम परिसरातील शेतकरी बांधवांनी कोराडी प्रकल्पातून जास्तीत जास्त गाळाचा उपसा करून तो गाळ आपल्या शेतात टाकावा. शेतात गाळ टाकल्याने गाळयुक्त जमिनीतून पिकांचा उतारा चांगला येतो. परिणामी त्याचा फायदा शेतकरी बांधवांना होतो. प्रकल्पातील गाळ काढल्यामुळे त्याचा परिणाम जलसाठा वाढीसाठी होतो. सुजलाम सुफलाम करीता लोकसहभागाची गरज असल्याचे  प्रतिपादन मेहकरचे तहसिलदार संतोष काकडे यांनी बोलतांना व्यक्त केले.
अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयात आयोजित  नियोजन बैकीत रविवारी (दि.४) ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जि.प.सदस्य संजय वडतकर, मेहकर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष जयचंद भाटिया, आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरेप्रभारी तालुका कृषि अधिकारी विजय सरोदेमंगलचंद कोठारी तथा आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना तहसिलदार काकडे म्हणाले कीकोराडी प्रकल्पातून दररोज लाख क्युबिक मीटर गाळ काढून शेतक-यांना पुरविला जाणार आहे. कोराडी प्रकल्पातून दररोज १५ ते २० तासांपर्यंत गाळ काढण्याचे काम अविरतपणे सुरू राहणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हया सुवर्ण संधीचा लाभ घेवून ट्रक्टरच्या मदतीने गाळ आपल्या शेतात टाकावा. असेही पुढे बोलतांना सांगीतले.
यावेळी तहसीलदार संतोष काकडे,कृषी अधिकारी विजय सरोदे,जि.प.सदस्य संजय वडतकर,मेहकर न.पा.चे उपाध्यक्ष जयचंद भाटिया यांनी व मंगलचंद कोठारी व जैन संघटनेच्या पदाधिका-यांनी कोराडी प्रकल्पाची व गाळ काढल्या जाणा-या ठिकाणाची पाहणी केली.

जैन संघटनेच्या पुढाकारातून प्रकल्पातील गाळाचा उपसा करण्याचे काम करण्याकरीता प्रत्येक तालुक्याला १० जेसीबी मिळणार आहेत. गाळ उपसा करण्याचे काम करण्यासाठी सुनियोजीत यंत्रणा सज्ज राहणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हया संधीचा लाभ घ्यावा.
                                                  विजय सरोदे प्रभारी तालुका कृषी अधिकारी
लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा