Responsive Ads Here

बुधवार, ७ मार्च, २०१८

हिवरा आश्रम येथे भारतीय स्टेट बँकेच्या ए.टी.एम.मशीनचा शुभारंभ


आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांच्या हस्ते उदघाटन




हिवरा आश्रम येथे मोठे शैक्षणीक संकुल असून राज्याच्या कानाकोप-यातील सुमारे पाच हजार विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. हिवरा आश्रम येथे तीर्थक्षेत्र व पर्यटन हे दोन्ही असल्यामुळे भक्त आणि पर्यटकांची कायम वर्दळ असते. नागरीकांची ए.टी.एम अभावी होणारी गैरसोय लक्षात घेवून भारतीय स्टेट बँक शाखा हिवरा आश्रमने नुकतीच ए.टी.एम.सुविधा सुरू केली. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या प्रयत्नातून गत दीड ते दोन वर्षापासून स्टेट बँकेची शाखा सुरू झाली होती परंतु ए.टी.एम. मशीनची सुविधा  नसल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत होती. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांच्या हस्ते ए.टी.एम.मशीनचे उदघाटन शुभारंभ बुधवार (दि.७) रोजी करण्यात आला. भारतीय स्टेट बँकेच्या ए.टी.एम.सुविधेचा लाभ हिवरा आश्रम परिसरातील विद्यार्थी,पालकसरकारी नोकरदार वर्ग,माजी सैनिक,केंद्र शासन कर्मचारी,सेवानिवृत्त कर्मचारी यांना होणार आहे. एटीएम मशीन सुरू  झाल्यामुळे विद्यार्थी,पालक,जेष्ठ नागरीक,कर्मचारी व सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी आश्रमाचे सचिव संतोष गोरेविश्वस्त नारायण भारस्कर,अशोक गि-हे,प्रा.कैलास भिसडे,प्राचार्य डॉ.सावरकर,अणाजी सिरसाटमधुकर आढाव,व्यापारी सतिष राठी,विजय कापड दुकानचे संचालक प्रदीप पडघानवसंतआप्पा सांबपूरेह.भ.प.निवृत्तीनाथ येवले महाराजपोलीस पाटील विवेक लहाने,लक्ष्मी हार्डवेअरचे संचालक विजय पटेल,पुनीत लाहोटी तथा आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाखा व्यवस्थापक नयनेश गुरव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅशियर राजू निकम,ओम खराटे,राजू कंकाळ यांनी अथक परिश्रम घेतले.

हिवरा आश्रम परिसरात जेष्ठ नागरीक व पेन्शन धारकांची संख्या खुप आहे. एटीएम सेवा सुरू झाल्यामुळे जेष्ठ नागरीक व पेंशनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
                                                   शेषराव नामदेव दळवी, ज्येष्ठ नागरिक हिवरा आश्रम

अपंग व्यक्तीला अपंगत्वामुळे काही शारीरीक मर्यादा येतात. हिवरा आश्रम येथे ए.टी.एम. सुविधा सुरू झाल्यामुळे अपंग व्यक्तीला या सेवेचा लाभ होवून शारीरीक त्रास सुध्दा कमी होईल.
                                            संदीप घागरे,दिव्यांग हिवरा आश्रम

हिवरा आश्रम येथील नोकरदार,जेष्ठ नागरिक,पेंशनधारक व विद्यार्थी यांची गरज लक्षात घेवून भारतीय स्टेट बँक शाखा हिवरा आश्रम ने ए.टी.एम. सेवा सुरू केली आहे. या ए.टी.एम. सेवेचा लाभ परिसरातील नागरीकांना होईल.
                                                                नयनेश गुरव,शाखा व्यवस्थापक एस.बी.आय.हिवरा आश्रम




संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम

मो ९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा