Responsive Ads Here

सोमवार, ५ मार्च, २०१८

मधूमेहावर जेष्ठांनी जागृकतेने करावे नियंत्रण !
  



जसजसा वृध्दापकाळ जवळ येतो वाढत्या वयोमानानुसार जेष्ठ नागरीकांच्या आरोग्याच्या समस्यांत सुध्दा वाढ झाली नाही तर नवलच. जेष्ठांच्या वाढत्या वयात त्यांचे शारीरीक,मानसिक आरोग्य उत्तरोतर बिघडत व ढाळसत जाते. जेष्ठांना थोडा सुध्दा वातावरणात  बदल झाल्यास सर्दी, खोकला, अंगदुखी, थंडी व ताप यासारखे आजाराचा सामना करावा लागतो. वाढत्या वयात सर्वाधिक जेष्ठांना मधुमेह हा सारख्या आजाराला सामना करावा लागतो. ज्या जेष्ठ स्त्री व पुरूषांना मधुमेह हा आजार आहे. अशा मधुमेही जेष्ठ व्यक्तींनी मधुमेहांची नियमीत तपासणी सोबत वैद्यकिय उपचार व थोडाफार शारीरीक व्यायाम केल्यास निश्चितच त्यांची शुगर नियंत्रीत होण्यास मदत होते. मधुमेह हा सुरुवातीला लक्षात न येणारा आजार आहे. मधुमेह झाला म्हणून घाबरुन न जाता त्याचा सामना केला पाहिजे. वैद्यकीय तज्ज्ञांकडून वेळच्या वेळी तपासण्याजीवनशैलीमध्ये बदल त्याचबरोबर धावणेचालणेसायकलिंग यांसारखे व्यायाम नियमित करुन या मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते.

अशी घ्यावी मधुमेहाची काळजी
मधुमेह असणा-यांनी जेष्ठांनी नियमित आहारासोबत संतुलीत आहाराचे सेवन करावे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग करावा. गोड पदार्थांचे सेवन करणे टाळावे. पिझ्झा, नूडल्स,पाष्टा असे जंक व फास्ट फूड खाणे कटाक्षाने टाळा. वजन आटोक्यात ठेवावे व वजन वाढणार नाही याकडे लक्ष द्यावे. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेतल्यास मधुमेह नियंत्रीत होवू शकतो.

अशी आहे मधुमेहाची लक्षणे
वारंवार भुक लागणे,कमालीचा थकवा जाणवे,घशाला कोरड पडून सतत तन्हाण लागणे,हाताला किंवा पायाला मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवे. चष्म्याचा नंबर सतत वाढत जाणे,शरीराला जखम झाल्यास लवकर बरी न होणे, चिडचिड वाढणे ही मधुमेह झाल्याची लक्षणे आहेत.

असा होतो मधुमेह
ग्लुकोज नावाची साखर प्रत्येकाच्या रक्तात असते. आहारातील पिष्टमय पदार्थ आणि कर्बोदकांचे पचन होऊन त्यांचे ग्लुकोज साखरेत रुपांतर होतेआणि ही साखर नंतर रक्तप्रवाहात जाते. ही साखरेची पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा अधिक झाली की स्वादुपिंडाच्या बीटा पेशी कार्यरत होतात आणि योग्य प्रमाणात इन्सुलिन नामक संप्रेरकाची निर्मिती करतात. इन्सुलिन संप्रेरक या वाढणा-या रक्तातील साखरेला नियंत्रीत ठेवतात.
आपल्या रक्तातली साखर साधारण ८० ते १२५ या सुरक्षित पातळ्यांमध्ये राखली जाते. जेव्हा स्वादुपिंडातून इन्सुलिन तयार होण्याचे कार्य मंदावते किंवा इन्सुलिनचा रक्तातील साखरेचा प्रभाव कमी होतोतेव्हा आपल्या रक्तातली साखरेची पातळी सुरक्षित मर्यादेच्या बाहेर जाते. तेंव्हा व्यक्तीला मधुमेह होतो.

लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा