Responsive Ads Here

रविवार, ४ मार्च, २०१८

सत्संग भाग ५


काळवेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥


भगवत प्राप्तीची जी अनेक साधने शास्त्रांनी सांगीतलेली आहेत त्यांत स्थळ ,काळ ,शुची अर्थात पवित्रता इ.नियमाचे अत्यंत काटेकोरपण पालन करावे लागते.परंतु भगवंताच्या नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे काळ वेळेचे बंधन नाही.
भगवंताच्या नामाचे अखंड चिंतन,नामस्मरण केल्यामुळे मुनष्याला खर्‍या अर्थाने मानसिक शांतीसमाधान मिळते. आजचा काळ हा अत्यंत धकाधकीचा आहे. मनाचे संतुलन राखण्यासाठी मनशांती सुध्दी भगवंताच्या नामाचा जप करणे आवश्यक आहे. भगवंताच्या नामाचा जप ,उच्चारण करण्याकरीता कुठल्याही काळ,वेळेचे बंधन नाही. नाम घेतांना चित्त एकाग्र असणे आवश्यक आहे.भक्ताने शुध्द अंतःकरणात केवळ भगवंताच्या उच्चारण केले तरी पुरेसे आहे. कोठेही नाम घेतले तरी ते त्याच्यापर्यंत पोचणारच. भगवंताच्या नामाच्या उच्चाराणे अनेक भक्त उध्दरले.आपल्या जिव्हेव्दारे जो भक्त अखंड नामजप करतो त्याच्या  दैवाला पारावार राहत नाही. ज्ञानेश्वर माऊली भक्ताला मार्गदर्शन करतांना सांगतात की,हया नामजपाने वैकुंठाचा मार्ग सहज सोपा होतो. म्हणून भक्तांने रात्रदिंनी केवळ भगवंताच्या नामाचे चिंतन,स्मरण,करावा असा मौलीक संदेश माऊली देतात.
भगवंत स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे आहे. त्याची सहज आणि अखंड अनुभूती घेण्यासाठी नामासारखे साधन नाही.


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा